कोल्हापूर : ऑनलाइनखरेदीचा वाढलेला ट्रेंड लक्षात घेऊन केंद्र सरकारने 'ओएनडीसी'च्या (ओपन नेटवर्क डॉट डिजिटल कॉमर्स) माध्यमातून उत्पादकांसाठी बाजारपेठ खुली केली आहे. यामध्ये थायलंड देश संलग्न झाल्याने बाजारपेठेची व्याप्ती वाढली आहे.
इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी मार्जिनवर 'ओएनडीसी' ही सेवा देणार आहे. येथील शेतकरी, छोट्या उद्योजकांसाठी व्यासपीठ मिळाले असून उत्पादन सहज व चांगल्या दराने विक्री करू शकतात, अशी माहिती थायलंडचे वाणिज्य सल्लागार व 'गोकुळ'चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. नरके म्हणाले, सध्या खरेदीसाठी वेळ नसल्याने ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये अनेक कंपन्या सक्रिय असल्या तरी त्यांचे मार्जिन ४५ टक्क्यापर्यंत असते, त्याचा फटका उत्पादकांसह ग्राहकांना बसतो.
'ओएनडीसी' अवघ्या ३ ते ५ टक्के मार्जिनवर ग्राहकांना सेवा देणार सहयोगी झाल्याने इंडोनिशियासह आशिया खंडात भारतातील उत्पादने ऑनलाइन विक्री करता येणार आहेत.
देशातील २३६ शहरात ही सेवा सुरु असून त्याचा फायदा आपल्या उत्पादकांना होणार आहे. येथील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा माझा उद्देश असून कंपनी सचिवांच्या माध्यमातून नोंदणी करून आपला माल ते विक्री करू शकतात.
कोल्हापूरला कसा फायदा
'कोल्हापुरी गूळ', 'आजरा घनसाळ तांदूळ', 'काजू, नाचणीचे पदार्थ, 'कोल्हापुरी चप्पल', 'कोल्हापुरी साज', 'चांदीचे दागिने', 'कपडे 'केळी याची थेट विक्री करता येणार.
११६ बिलियन डॉलर व्यवहार
देशात वर्षभरात ११६ बिलियन डॉलर ऑनलाइन बाजारातील उलाढाल आहे. यामध्ये 'ओएनडीसी'च्या माध्यमातून निश्चित वाढ होईल, असा विश्वास नरके यांनी व्यक्त केला.
पोस्ट ऑफिसव्दारे सेवा
कमी पैशात खरेदी केलेली वस्तू पोहोचविण्यासाठी भारत व थायलंडमधील पोस्ट ऑफिसेस महत्त्वाचे दुवा आहेत. त्यांना सहभागी करून घेण्यासाठी चर्चा झाल्याचे नरके म्हणाले.
अधिक वाचा: CIBIL Score : तुमचा सिबिल स्कोर किती हवा म्हणजे बँक तुम्हाला कर्ज देईल वाचा सविस्तर