Join us

एक कोटी शेतकऱ्यांनी काढला एका रुपयात पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2023 11:07 AM

३१,४०१ कोटींचा उतरवला विमा; ६३ लाख ६७,५८० हेक्टरवरील पिकांना संरक्षण

राज्य सरकारच्या एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत ९८ लाख ३० हजार शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली आहे. योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै असून रविवारी हा आकडा एक कोटीच्या पुढे जाईल. दिवसाला सरासरी साडेसहा लाख शेतकरी योजनेत सहभागी होत असून, आणखी किमान ५० लाख शेतकरी वाढतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

एक जुलैला सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत ९८ लाख ३० हजार ३५८ शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे १०४% इतके झाले आहे. सर्वाधिक ३१ लाख १ हजार ९७ शेतकरी लातूर विभागातील असून, सर्वांत कमी ५३ हजार ६७८ शेतकरी कोकण विभागातील आहेत. याबाबत कृषी विभागातील विस्तार व प्रशिक्षण सहसंचालक विनय आवटे म्हणाले, कमी जमीन धारणा क्षेत्र, आपत्कालीन परिस्थितीत विमा लाभ मिळण्याचे कमी प्रमाण या कारणांमुळे पूर्व विदर्भ व कोकणातील भात उत्पादक सहभागी होण्याचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत पुणे, कोल्हापूर, अमरावती व नागपूर या चार घेतला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे विभागांमध्ये शेतकऱ्यांची संख्या प्रमाण सुमारे १०४ टक्के इतके झाले वाढल्याचे दिसून येत आहे.'

३१ हजार कोटींचा विमा

सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या ६३ लाख ६७ हजार ५८० हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण मिळाले असून, ३१ हजार ४०१ कोटींचा विमा उतरविण्यात आला आहे. त्यातील राज्याचा हिस्सा २ हजार ८२४ कोटी रुपये असून केंद्र सरकार आपल्या हिश्श्यापोटी २ हजार २५ कोटी रुपये देणार आहे. तर, एकूण विमा हप्ता हा ४ हजार ९११ कोटींचा झाला आहे. आतापर्यंत एकूण विमा उतरलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत ३१.५५ शेतकरी लातूर विभागातील आहेत. त्याखालोखाल २९.७४ शेतकरी संभाजीनगर विभागातील आहेत. सर्वांत कमी अर्थात अर्धा टक्के शेतकरी कोकण विभागातील आहेत.

टॅग्स :शेतकरीकांदापीक विमाशेती क्षेत्रपीकशेती