Lokmat Agro >शेतशिवार > यंदा कांदा बिजाचे उत्पादन घटणार; मधमाश्या ठरताहेत करणीभूत?

यंदा कांदा बिजाचे उत्पादन घटणार; मधमाश्या ठरताहेत करणीभूत?

Onion seed production will decrease this year because of honeybees | यंदा कांदा बिजाचे उत्पादन घटणार; मधमाश्या ठरताहेत करणीभूत?

यंदा कांदा बिजाचे उत्पादन घटणार; मधमाश्या ठरताहेत करणीभूत?

मधमाशीच्या समस्येमुळे कांदा बीज उत्पादनात घट

मधमाशीच्या समस्येमुळे कांदा बीज उत्पादनात घट

शेअर :

Join us
Join usNext

पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रासायनिक औषधांची फवारणी करण्यात येते. रासायनिक औषधांच्या अति वापरामुळे कीटक आणि पक्ष्यांच्या अन्न साखळीवर परिणाम दिसत आहे. मधमाश्यांची संख्या कमी झाल्याचा परिणाम कांद्याच्या बीज उत्पन्नावर झालेला आहे. मधमाश्यांची संख्या कमी असल्याने कांदा पिकावर परागीकरण झाले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील हस्तपोखरी, कर्जत, लालवाडी, धनगर पिंपरी पारनेर हा भाग कांदा बियाण्याचा आगर समजला जातो. मात्र यावर्षी मधमाश्यांच्या अभावामुळे या आगराच्या कांदा बीज उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. ज्यातून कांदा बिजांचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस मधमाश्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने कांदा बीज उत्पादनावर मोठा परिणाम दिसून येत आहे.

मधमाश्यांमुळे पिकाचे गोंड्यात परागीकरण होते. परंतु, मधमाश्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे कांदा बीज उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे कृषी सहायक डी.आर. मिसाळ यांनी सांगितले.

चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊस उत्पादनाचा ब्रॅंड 

बिजांचा भरणा नाही

• हस्तपोखरी येथील शेतकरी विठ्ठलराव सोनवणे यांनी यंदा तीन एकरात कांदा बिजाचे पीक घेतले आहे. पीक चांगले बहरले आहे.

• परंतु, ऐन बीज भरण्याच्या वेळी मधमाश्यांकडून परागीकरण होत नसल्याने गोंड्यात म्हणावा तसा बिजाचा भरणा झालेला नाही. यामुळे उत्पन्न कमी होणार असल्याचे विठ्ठलराव सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: Onion seed production will decrease this year because of honeybees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.