Lokmat Agro >शेतशिवार > राहुरी विद्यापीठाकडून कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध; कुठे मिळणार बियाणे?

राहुरी विद्यापीठाकडून कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध; कुठे मिळणार बियाणे?

Onion seeds available for sale from Rahuri University; Where to get seeds? | राहुरी विद्यापीठाकडून कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध; कुठे मिळणार बियाणे?

राहुरी विद्यापीठाकडून कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध; कुठे मिळणार बियाणे?

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेले खरीप कांदा बियाणे फुले समर्थ व फुले बसवंत- ७८० या वाणांची दि. २१ मे २०२४ पासून विक्री शुभारंभ झाला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेले खरीप कांदा बियाणे फुले समर्थ व फुले बसवंत- ७८० या वाणांची दि. २१ मे २०२४ पासून विक्री शुभारंभ झाला आहे. 

सदर कांदा बियाणांची विक्री विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रमूख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंके यांनी दिली आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या कांद्याच्या फुले समर्थ व फुले बसवंत-७८० या वाणांना शेतकऱ्यांकडून दरवर्षी मोठी मागणी असते.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विद्यापीठातील मध्यवर्ती परिसरात बियाणे विक्री आणि मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक असलेल्या नाशिक, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील कृषि विद्यापीठाचे
१) कृषि संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक
२) कांदा, लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक
३) कृषि संशोधन केंद्र, चास, जि. अहमदनगर
४) कृषि संशोधन केंद्र, बोरगाव, जि. सातारा
५) कृषि महाविद्यालय, मालेगाव, जि. नाशिक
६) कृषि संशोन केंद्र, लखमापुर
७) कृषि विज्ञान केंद्र, धुळे
८) कृषि महाविद्यालय, पुणे
९) कृषि महाविद्यालय, हाळगाव ता. जामखेड, जि. अहमदनगर या ठिकाणी या वाणांची विक्री सुरु करण्यात येणार आहे.

यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या जिल्ह्यामध्येच सदरचे कांदा बियाणे प्रति किलो रु. १५०० प्रमाणे उपलब्ध होणार आहे. त्याचा सर्व शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रमूख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंके यांनी केले आहे.

अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावर चुकीचे नाव लागले असेल तर नावात बदल करता येऊ शकतो का?

Web Title: Onion seeds available for sale from Rahuri University; Where to get seeds?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.