Lokmat Agro >शेतशिवार > Orange fruit crop : संत्रावर्गीय फळ पिकास मदत जाहीर; कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ ते वाचा सविस्तर

Orange fruit crop : संत्रावर्गीय फळ पिकास मदत जाहीर; कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ ते वाचा सविस्तर

Orange fruit crop: Aid announced for orange fruit crop; Read in detail which farmers will get the benefit | Orange fruit crop : संत्रावर्गीय फळ पिकास मदत जाहीर; कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ ते वाचा सविस्तर

Orange fruit crop : संत्रावर्गीय फळ पिकास मदत जाहीर; कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ ते वाचा सविस्तर

Orange fruit crop : नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Disaster) शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी खचला जातो. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आधार व दिलासा देण्यासाठी शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.

Orange fruit crop : नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Disaster) शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी खचला जातो. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आधार व दिलासा देण्यासाठी शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ऑगस्ट २०२४ मध्ये ढगाळ वातावरण आणि जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रा पिकाच्या (Orange Fruit Crop) फळगळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

यास विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाख ८ हजाराची मदत देणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज (२२ जानेवारी) रोजी दिली.

नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Disaster) शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी खचला जातो. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आधार व दिलासा देण्यासाठी शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे (Cloudy Weather and Continuous Rain) ऑगस्ट २०२४ कालावधीत ५ हजार ९३३ शेतकऱ्यांचे ३०१३.८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १०८४.९८ लाख रुपये मदत देण्यास मंजुरी दिली आहे.

तसेच, जुलै ते ऑगस्ट २०२४ कालावधीत अमरावती जिल्ह्यातील ४१ हजार ९११ शेतकऱ्यांचे ३७३९३.९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १३४६१.८३ लाख रुपये, अकोला जिल्ह्यातील ३ हजार ४३३ शेतकऱ्यांचे ३०२९.५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Damage Crops) झाले होते.

या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १०९०.६२ लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील ३ हजार ८५२ शेतकऱ्यांचे २६२६.८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून ९४५.६५ लाख रुपयांची मदत मंजुर करण्यात आली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Dudh Anudan : १२ हजार दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा

Web Title: Orange fruit crop: Aid announced for orange fruit crop; Read in detail which farmers will get the benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.