पावसाळ्यात पावसाचा पडल्याचा सोयाबीन पिकाला जोरदार फटका बसला. हातचे सोयाबीन गेले. नरखेड तालुक्यात आता काही दिवसांपासून आंबिया बहाराची मोसंबी,संत्रा फळाची फळगळ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शासनाने फळ उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी आग्रा ग्रामपंचायतीचे सरपंच नंदलाल मोवाडे यांनी केली आहे.
नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन पिकाला प्राधान्य देत सोयाबीन पिकांचा पेरा जास्त केला. पण, तालुक्यात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस आला. सोबतच पावसात वारंवार खंड पडल्याने सोयाबीन पिकावर जास्तच परिणाम झाला. किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे पीक होतचे गेले.
संत्रा आणि मोसंबी फळपिकातील फळगळ त्यावरील उपाययोजना
१२ तास वीज पुरवठा द्या
शेतकऱ्यांसाठी हा काळ पिकांना पाणी देण्याचा आहे. ओलिताचा महत्वाचा काळ आहे. शेतकऱ्यांना पिकाला ओलीत देण्यासाठी कृषी पंपाला दिवसाला १२ तास वीजपुरवठा देण्याची मागणीसुद्धा सरपंच नंदलाल मोवाडे यांनी केली.
त्यानंतर काही दिवसांनी सतत पाऊस झाला. किडीच्या प्रादुभार्वातून शिल्लक राहिलेले सोयाबीन पिके सडल्या गेले. तालुक्यात ९० टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतीत झाले असतानाच आंबिया बहार मोसंबी संत्रा फळांची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. बगिच्यातील संत्रा मोसंबी अर्ध्यावर खाली आली. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडले आहे.
आता सोयाबीन आणि मोसंबी उत्पादक शेतकरी पूर्णतः आर्थिक संकटात सापडले आहेत. या संकटातून बाहेर काढण्याकरिता त्यांना सोयाबीन पिकांना सरसकट पीक बिमा मोबदला द्यावा. तसेच शासनाने संत्रा मोसंबी फळगळनुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी सरपंच नंदलाल मोवाडे यांनी केली.