Join us

शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 12:22 PM

शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय आला आहे.

शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन कारणांमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्यासाठी सहाय्यक अनुदानापोटी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना वित्तीय सहाय्य सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात खालील विवरणपत्रात नमूद केल्यानुसार सर्व विभागीय आयुक्त यांना वितरीत करण्यात येत आहे.

विभागीय आयुक्त तथा नियंत्रक अधिकारीवितरीत अनुदानाची रक्कम (रूपये लाखात)
कोकण१.३३
पुणे४४.६७
नाशिक१९७.६७
औरंगाबाद१५५.३३
अमरावती१९७.३३
नागपूर६३.६७
एकूण६६०.००

तसेच सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात शेतकरी आत्महत्यांचा अंदाज बांधणे शक्य नसल्याने निधी आहरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांत विहित कार्यवाही तातडीने पूर्ण करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात यावी.

या प्रयोजनासाठी होणारा खर्च आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना वितरित केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास तात्काळ सादर करावे. असे आदेश विभागीय आयुक्त स्तरावर देण्यात आले आहेत.

टॅग्स :शेतकरी आत्महत्याशेतकरीराज्य सरकारसरकार