Lokmat Agro >शेतशिवार > Organic Farming : देशी गोपालनाला मिळाली गांडूळ प्रकल्पाची जोड; आता सेंद्रिय शेती उत्पादनाला नाही तोड

Organic Farming : देशी गोपालनाला मिळाली गांडूळ प्रकल्पाची जोड; आता सेंद्रिय शेती उत्पादनाला नाही तोड

Organic Farming: Country cow husbandry gets addition of earthworm project; Now there is no break in organic farming production | Organic Farming : देशी गोपालनाला मिळाली गांडूळ प्रकल्पाची जोड; आता सेंद्रिय शेती उत्पादनाला नाही तोड

Organic Farming : देशी गोपालनाला मिळाली गांडूळ प्रकल्पाची जोड; आता सेंद्रिय शेती उत्पादनाला नाही तोड

सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील शेतकरी दादासाहेब आणि त्यांचे बंधू युवराज चव्हाण (Dadasaheb and Yuvraj Chavan) यांनी गांडूळ खताबरोबरच देशी गाय पालनाचा उपक्रम राबवून शेती आर्थिक फायद्यात आणली. या दिवंगत वसंत मास्तर फार्मला अनेक शेतकऱ्यांच्या बरोबर विविध संस्थेचे पदाधिकारी भेटी देत आहेत. (koparde Haveli)

सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील शेतकरी दादासाहेब आणि त्यांचे बंधू युवराज चव्हाण (Dadasaheb and Yuvraj Chavan) यांनी गांडूळ खताबरोबरच देशी गाय पालनाचा उपक्रम राबवून शेती आर्थिक फायद्यात आणली. या दिवंगत वसंत मास्तर फार्मला अनेक शेतकऱ्यांच्या बरोबर विविध संस्थेचे पदाधिकारी भेटी देत आहेत. (koparde Haveli)

शेअर :

Join us
Join usNext

'शेती करणे म्हणजे आर्थिक आतबट्ट्याचा उद्योग ठरत असतानाच शेतीला पूरक व्यवसाय सुरू करून उद्योग-धंद्याचा कारखानाच बनवला आहे.

सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील शेतकरी दादासाहेब आणि त्यांचे बंधू युवराज चव्हाण यांनी गांडूळ खताबरोबरच देशी गाय पालनाचा उपक्रम राबवून शेती आर्थिक फायद्यात आणली. या दिवंगत वसंत मास्तर फार्मला अनेक शेतकऱ्यांच्या बरोबर विविध संस्थेचे पदाधिकारी भेटी देत आहेत.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम पाटणकर यांनी भेट देऊन या प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी पाटण भाजपा कराड तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे, शेतकरी अंकुश साळुंखे, सूर्यकांत डुबल, रवींद्र यादव, प्रल्कप फर्मचे शेतकरी दादासाहेब चव्हाण उपस्थित होते.

दादासाहेब चव्हाण म्हणाले, 'सध्या रासायनिक खतापेक्षा नैसर्गिक शेतीची गरज आहे. त्यासाठी मी आणि माझे बंधू शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाय पालन करत असतो. लहान मोठ्या गायींची संख्या तीस आहे. त्यापासून गांडूळ खत, दूध, तूप, गोमूत्र यांची विक्री होते, तसेच माझ्या शेतीला रासायनिक खताऐवजी गांडूळ खताचा वापर करतो. शिल्लक राहिलेले खत विकतो त्याला चांगली मागणी आहे.'

यावेळी पाटणकर म्हणाले, 'शासनाच्या माध्यमातून गोपालनाला अनुदान आहे. त्याचा फायदा नक्कीच घ्या. मीही शेतकरी असल्याचा स्वतःच गांडूळ खत तयार करणार आहे.' शेतातील हा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी येत असतात.

आधुनिक पद्धतीने शेती

• चव्हाण हे आधुनिक पद्धतीने शेती करतात.
• त्यांनी टोमॅटो, आले, ऊस, पिकाला ते गांडूळ खताचा वापर करतात.
• त्यांचा वसंत मास्तर फार्म पाहण्यासाठी अनेक शेतकरी येतात.

हेही वाचा : Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी

Web Title: Organic Farming: Country cow husbandry gets addition of earthworm project; Now there is no break in organic farming production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.