Lokmat Agro >शेतशिवार > विदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर झाला सेंद्रिय शेती विकास

विदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर झाला सेंद्रिय शेती विकास

Organic farming development was done on 15 thousand hectares in the district where six farmers committed suicide in Vidarbha | विदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर झाला सेंद्रिय शेती विकास

विदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर झाला सेंद्रिय शेती विकास

येत्या तीन वर्षात राज्यात १३ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती

येत्या तीन वर्षात राज्यात १३ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती

शेअर :

Join us
Join usNext

विदर्भातीलशेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यात १५ हजार ६८२ हेक्टर शेती सेंद्रिय प्रमाणिकरणाखाली आली असून, येत्या तीन वर्षात राज्यात १३ लाख हेक्टरवर नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखाली आणण्यात येणार आहे. यासाठीचे काम डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनद्वारे सुरू करण्यात आले आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतामाळ व वर्धा या आत्महत्याग्रस्त व नैराश्यग्रस्त सहा जिल्ह्यात २०१८-१९ पासून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. येथील शेतकऱ्यांना या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विविध उपक्रम राबिवण्यात येत आहे. तद्वतच सेंद्रिय शेतीलाही चालना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ९,२६८ शेतकऱ्यांचे १५,६८२ शेतकऱ्यांचे प्रमाणिकरणाखाली आणण्यात आले आहे. तसेच २० हेक्टर क्षेत्राचे ४३५ गट स्थापन करण्यात आले असून, त्या गटांच्या ४० शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यांचा महासंघ स्थापन करण्यात आला आहे. यातून शेतकऱ्यांचे एकूण २.८२ कोटी भागभांडवल जमा झाले आहे. १२ किरकोळ विक्री केंद्र, १७ समूह संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा महासंघ ऑरगॅनिक मिशन (एमओएम) नावाचा ब्रँड तयार करण्यात आला आहे. या ब्रँडच्या नावाने सेंद्रिय शेतमालाची विक्री करण्यात येत आहे.

राज्याला 'जैविक इंडिया अवॉर्ड

बंगरुळूच्या इंटरनॅशनल कॉम्पिटन्स सेंटर फॉर ऑरगॅनिक अॅग्रीकल्चर (आयसीसीओए) कडून देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा जैविक इंडिया अवॉर्ड पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. आत्माचे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राज्यात जैव निविष्ठा संसाधन केंद्रे स्थापन करण्यात येणार असून, राज्यातील कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीवरील संशोधनाबाबत कर्मचारी व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे पुणे येथील 'आत्मा'चे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचे कार्यक्षेत्र आता राज्यभर

■ डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन कार्यक्षेत्र विस्तारून आता संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आले. असून योजनेचा कालावधी येत्या २०२७-२८ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

■ योजनेंतर्गत तीन वर्षांत राज्यात १३ लाख हे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखाली आणावयाचे आहे. समूह संकल्पनेद्वारे १८,८२० उत्पादक गट व १८२५ शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

Web Title: Organic farming development was done on 15 thousand hectares in the district where six farmers committed suicide in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.