दिवसेंदिवस शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळावे, यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वारेमाप वापर करतात. परंतु वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील गजानन सोळंके यांनी गांडुळ खत निर्मितीतून उत्पन्न मिळविले. सोबतच सेंद्रीय खताचा वापर करुन शेतीही फुलविली.
दिवसेंदिवस शेतीतून भरघोस उत्पन्न व्हावे, यासाठी रासयनिक खते, औषधांचा वापर शेतीत होत आहे. परंतु नागठाना येथील शेतकरी गजानन सोळंके यांनी रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय शेतीवर भर दिला. दिवसेंदिवस रासायनिक खते, औषधे, किटकनाशकांचे वाढते दर परवडत नसल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून त्यांनी सेंद्रीय शेतीवर विशेष लक्ष दिले.
उत्पन्न कमी आणि खर्च वाढतच असून रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोतही खालावत चालल्याची बाब गजानन सोळंके यांच्या लक्षात आल्यामुळे गांडूळ खत निर्मिती सुरु केली.
वर्षाकाठी ७० ते ८० हजाराचे उत्पन्न !
गांडुळ खत निर्मितीतून तयार होणारे खत विक्रीतून त्यांना वर्षाकाठी ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न गांडूळ खत विक्रीतून होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक शेती टाळून सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर असल्याची बाब त्यांनी दाखवून दिली.
जमीनीचा पोत सुधारण्यास मदत !
मातीच्या कणांच्या रचनेत योग्य बदल घडविला जातो. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप कमी होते. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. जमिनीचा सामू योग्य प्रमाणात राखला जातो. त्यामुळे सोळंके यांनी त्याची संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने केली. यातुन उत्पन्न तर वाढलेच शिवाय जमीनीचा पोत राखण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगीतले.