Lokmat Agro >शेतशिवार > Organic Farming : सेंद्रीय उत्पादनासाठी कृषी विद्यापीठाचा पुढाकार; भरड धान्याचा समावेश

Organic Farming : सेंद्रीय उत्पादनासाठी कृषी विद्यापीठाचा पुढाकार; भरड धान्याचा समावेश

Organic Farming : University of Agriculture initiative for organic production; Including coarse grains | Organic Farming : सेंद्रीय उत्पादनासाठी कृषी विद्यापीठाचा पुढाकार; भरड धान्याचा समावेश

Organic Farming : सेंद्रीय उत्पादनासाठी कृषी विद्यापीठाचा पुढाकार; भरड धान्याचा समावेश

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रीय शेतीसाठी नवीन प्रयोग केले आहेत. जाणून घेऊयात अधिक माहिती (Organic Farming)

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रीय शेतीसाठी नवीन प्रयोग केले आहेत. जाणून घेऊयात अधिक माहिती (Organic Farming)

शेअर :

Join us
Join usNext

रासायनिक खातांचा वापर अधिक प्रमाणात वाढल्याने अनेक आजारांसामोरे जावे लागत आहे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने या अर्थिक वर्षात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे आता विषमुक्त अन्नधान्य उत्पादनासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.

याकरिता एक विभाग व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. सेंद्रिय पिकांचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. यावर्षी पोषण आहारासाठी लागणाऱ्या भरड धान्याचा प्रयोग करण्यात आला आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेतीवर काम सुरू केले असून, गेल्या १५ वर्षांपासून सेंद्रीय शेती प्रमाणपत्र अभ्यासक्रम  व क्षेत्रावर सेंद्रिय पीक उत्पादनाचे काम सुरू केले आहे. 

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन 

सेंद्रिय शेतीचा प्रसार व्हावा, या क्षेत्रात या पिकांचे उत्पादन घेऊन शेतकरी, बेरोजगारांनी शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारावे, याकरिता सेंद्रिय प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू केलेला आहे. 

सेंद्रिय शेतीचे तंत्र

शेतकरी, बेरोजगारांनी सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान अवगत केले आहे. केंद्र शासनाने नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे. यामुळे सेंद्रिय शेतीला चालना मिळाली असून, या कृषी विद्यापीठानेदेखील याबाबत जोमाने काम सुरू केले आहे. 

शेती प्रमाणपत्र अभ्यासक्रम 

शेती प्रमाणपत्र अभ्यासक्रम व क्षेत्रावर सेंद्रिय पीक उत्पादनाचे काम सुरू केले आहे. यासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे.

सेंद्रीय पिके दहा हेक्टरवर

यावर्षी कृषी विद्यापीठात दहा हेक्टरवर सेंद्रिय कापूस, उडीद, सोयाबीन व तूर या पारंपरिक पिकांसह भरड धान्य या पिकांची पेरणी केली आहे.

Web Title: Organic Farming : University of Agriculture initiative for organic production; Including coarse grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.