Lokmat Agro >शेतशिवार > Organic Vegetables विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला उत्पादनात झाली वाढ; मागणीनुसार घरोघरी विक्री करून शेतकरी मिळवताहेत अधिकचा नफा

Organic Vegetables विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला उत्पादनात झाली वाढ; मागणीनुसार घरोघरी विक्री करून शेतकरी मिळवताहेत अधिकचा नफा

Organic Vegetables increased production of toxin-free organic vegetables; Farmers get more profit by selling door to door according to demand | Organic Vegetables विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला उत्पादनात झाली वाढ; मागणीनुसार घरोघरी विक्री करून शेतकरी मिळवताहेत अधिकचा नफा

Organic Vegetables विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला उत्पादनात झाली वाढ; मागणीनुसार घरोघरी विक्री करून शेतकरी मिळवताहेत अधिकचा नफा

शेतातील मातीचा दर्जा टिकून राहिला तरच उत्पादनात भर पडणार आहे. ही बाब लक्षात घेऊन वाशिम तालुक्यातील ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला उत्पादन घेणे सुरू केले आहे. उत्पादित मालाची मागणीनुसार घरोघरी विक्री केली जात असून, त्यांना कृषी विभागाचे सहकार्य मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यासंदर्भात माहिती देताना 'आत्मा'चे तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी सांगितले की, कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन मिळत असल्याने अधिकांश शेतकऱ्यांचा कल आजही रासायनिक शेतीकडे आहे. जास्त उत्पादन मिळविण्यासाठी मशागतीपासून ते पीक काढण्यापर्यंत खत, कीटकनाशक, तणनाशक, आदी घटकांचा उपयोग केला जात आहे.

त्यातून उत्पादनात भर पडत आहे. मात्र, पिकांतील रासायनिक घटकांचा मानवी शरीरावर विपरित परिणाम होत आहेत. शिवाय जमिनीचा पोतही बिघडत चालला आहे. त्यामुळेच आरोग्य जपणारे नागरिक सेंद्रिय शेतीतून पिकविलेल्या अन्नधान्याला पसंती देत असून, सेंद्रिय शेतीमाल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळत असल्याचे लव्हाळे यांनी सांगितले.

सेंद्रिय भाजीपाला आरोग्यासाठी लाभदायी

सेंद्रिय भाजीपाला आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतो. रासायनिक खत, घातक कीटकनाशकांचा वापर होत नसल्याने विषमुक्त भाजीपाला मिळतो.

जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. वाशिम तालुक्यातील अनेक शेतकरी स्वयंस्फूर्तिने सेंद्रीय भाजीपाला उत्पादित करून घरोघरी विकत आहेत. त्यांना त्यातून चांगली मिळकत होत आहे. - जयप्रकाश लव्हाळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा वाशिम.

हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी

Web Title: Organic Vegetables increased production of toxin-free organic vegetables; Farmers get more profit by selling door to door according to demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.