Join us

कृषिकन्यांकडून दशपर्णी व निंबोळी अर्कनिर्मिती प्रात्यक्षिकाचे आयोजन

By रविंद्र जाधव | Published: July 14, 2024 6:06 PM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानाबाद (ता. गंगापूर) येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क निर्मितीविषयी मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाचे शनिवार (दि.१३) आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानाबाद (ता. गंगापूर) येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क निर्मितीविषयी मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाचे शनिवार (दि.१३) आयोजन करण्यात आले होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव (ता. वैजापुर) येथील कृषिकन्यांनी यावेळी दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क निर्मितीविषयी मार्गदर्शन करत प्रात्यक्षिक करून दाखविले. 

तसेच या वेळी दशपर्णी आणि निंबोळी अर्काचे एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्व उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आले. तसेच शेतीमध्ये रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांना दशपर्णी व निंबोळी अर्क निर्मिती विषयी माहिती देण्यात आली.

यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. बैनाडे, डॉ. पी. बी. कर्डिले तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. बी. बडे, प्रा. ए. आर. पगार, प्रा. जी. व्ही. घुगे यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी कृषिकन्या स्नेहल बोराटे, ऐश्वर्या गाडेकर, शुभांगी डिके,  तेजल भापकर, गायत्री डुकरे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. या प्रात्यक्षिक व मार्गदर्शन वेळी सुलतानाबाद येथील अनेक शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा -  Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी

टॅग्स :शेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेतकरीमराठवाडावसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ