Join us

हवामान अनुकूल शेती विषयावर जी-२० तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन

By मुक्ता सरदेशमुख | Published: September 05, 2023 3:13 PM

हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाच्या वतीने ' ...

हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाच्या वतीने 'हवामान अनुकूल शेती' या विषयावर कार्यशाळेच्या आयोजन करण्यात आले आहे. ४ ते ६ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे ही कार्यशाळा होणार आहे. 

 या जी-२० तंत्रिक कार्यशाळेत जगभरातील तज्ञांना एकत्र आणून हवामान बदलामुळे उद्भवलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कौशल्य व क्षमता वाढवण्याचा तसेच सहकार्य आणि माहितीची देवाणघेवाण करण्यावर या कार्यशाळेचा भर असणार आहे. कार्यशाळेतील शिफारसी मुळे हवामानास अनुकूल शेती साध्य करण्यास दिशा मिळेल असा विश्वास कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केला.

कृषी हे सर्वात संवेदनशील क्षेत्र असल्याचे शोभा करंदलाज यांनी आपल्या भाषणात नमूद केले. यावेळी हवामान बदलाचा मोठा प्रभाव g20 राष्ट्रे अनुभवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :शेतकरीहवामानशेती क्षेत्रशेतीपीक