Join us

भोंडवेवाडी येथे पोषण माह निमित्त भरडधान्य पोषण थाळी स्पर्धेचे आयोजन

By बिभिषण बागल | Published: September 06, 2023 7:41 AM

या स्पर्धेमध्ये गावातील २३ महिलांनी आपली थाळी स्पर्धेसाठी प्रदर्शित केली यामध्ये प्रथम पाच क्रमांक काढण्यात आले त्यामधून सौ. कल्पना मेरघळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष आणि राष्ट्रीय पोषण माह निमित्त भोंडवेवाडी या ठिकाणी भरडधान्य पोषण थाळी स्पर्धेचे आयोजन ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती आणि टेस्टी बाईट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक शेती व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत भोंडवेवाडी ता. बारामती जि. पुणे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आणि राष्ट्रीय पोषण माह निमित्त भरडधान्य पोषण थाळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. हरिभाऊ भोंडवे, बारामती सहकार दूध संघाचे मा. संचालक श्री.आप्पासो शेळके, भोंडवेवाडी गावच्या ग्रामसेविका सौ. एस. एस. लोणकर, भोंडवेवाडी गावच्या पोलीस पाटील सौ. प्रज्ञा भोंडवे, भोंडवेवाडी गावच्या मा. सरपंच सौ. उषाताई भोंडवे, प्रगतशील शेतकरी श्री. आबासो शेळके, श्री. राहुल भोंडवे, श्री. प्रभाकर भोंडवे उपस्थित होते

या स्पर्धेमध्ये गावातील २३ महिलांनी आपली थाळी स्पर्धेसाठी प्रदर्शित केली यामध्ये प्रथम पाच क्रमांक काढण्यात आले त्यामधून सौ. कल्पना मेरघळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांनी वरई पिठापासून भजी व खीर प्रदर्शित केली होती, द्वितीय क्रमांक सौ. रूपाली भोंडवे यांना मिळाला त्यांनी राळे थालीपीठ तयार केले होते, तृतीय क्रमांक सौ. कुसुम भोंडवे व वैशाली भोंडवे यांच्या थाळीला देण्यात आला त्यांनी राळे भजी, राळे मेंदू वडा, नाचणी पापड, ज्वारी चकली, बाजरी तिखट पुरी केली होती चतुर्थ क्रमांक सौ. प्रियंका ढोरे यांना देण्यात आला त्यांनी ज्वारी लाडू केले होते पाचवा क्रमांक सौ. शोभा शेळके यांनी ज्वारी बाजरी थालीपीठ, वरई वडी, डोसा, ईडली यांचा थाळीमध्ये सहभाग होता याव्यतिरिक्त इतर महिलांनी नाचणी पुरी, ज्वारी लाह्या, वरई चकली, वरई सांडगे, वरई सजोरी, बाजरी वडी, राळे खिचडी, वरी उपमा, ज्वारी शिरा, शंकरपाळे इ. थाळीमध्ये सहभाग होता सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले 

सदर मूल्यांकन करण्यासाठी शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या गृहविज्ञान विभागाच्या प्रमुख प्रा. शुभांगी तावरे व मोनिका भोसले तसेच के. व्ही. के. मार्फत सौ. प्रियंका सातव-जमदाडे यांनी महिलांनी केलेली मांडणी त्यामध्ये ठेवलेले भरडधान्य पदार्थ, त्याचा स्वाद व चव आणि त्यांचे आहारातील महत्त्व व माहिती या माहितीचा विचार केलेला आहे असे प्राध्यापक तावरे यांनी सांगितले 

केंद्राचे श्री. संतोष गोडसे यांनी भरडधान्याचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्रामध्ये भरडधान्य प्रसार करण्यासाठी तसेच त्यांच्या प्रक्रिया पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षणाचे आयोजन ट्रस्टचे चेअरमन मा. राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले सांगितले तसेच तालुकास्तरीय भरडधान्याच्या थाळी स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या पंधरा दिवसामध्ये करण्यात येणार असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे, वैभव घाडगे, प्रफुल पोटे, किरण मदने आणि दत्तात्रय पवार यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :महिलापाककृतीकृषी विज्ञान केंद्रबारामतीअन्न