Join us

रब्बी हंगाम २०२३-२४ साठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

By बिभिषण बागल | Published: September 27, 2023 10:14 AM

कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज आहुजा यांनी आज नवी दिल्लीत रब्बी हंगाम २०२३-२४ साठी आयोजित कृषी विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.

देशात २०१५-१६ पासून अन्नधान्य उत्पादनात वाढ होत आहे, असे कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज आहुजा यांनी आज नवी दिल्लीत रब्बी हंगाम २०२३-२४ साठी आयोजित कृषी विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. तिसऱ्या अग्रीम अंदाजानुसार (२०२२-२३), देशात अन्नधान्याचे उत्पादन ३३०५ लाख टन राहील असा अंदाज असून हे उत्पादन २०२१-२२ मधील अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा १४९ लाख टन अधिक आहे. तांदूळ, मका, हरभरा, कडधान्ये, रॅपसीड आणि मोहरी, तेलबिया आणि ऊसाच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज आहे. २०२२-२३ मध्ये एकूण कडधान्ये  आणि तेलबियांचे उत्पादन अनुक्रमे २७५ आणि ४१० लाख टन इतके विक्रमी असल्याचा अंदाज आहे, असे मनोज आहुजा यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.

गेल्या ८ वर्षांत एकूण अन्नधान्य उत्पादन ३१% वाढून २५१.५४ वरून ३३०.५४ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे. २०२२-२३ या वर्षासाठी तेलबिया आणि कडधान्य या कृषी उत्पादनांच्या निर्यातीचा हाच कल असून निर्यातीने ५३.१४५ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे, कृषी निर्यातीसाठीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. गेल्या दोन वर्षांतील ही कामगिरी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्यासाठी खूप पुढे घेऊन जाईल, असे सचिवांनी सांगितले.

मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा घेणे आणि मूल्यांकन करणे आणि राज्य सरकारांशी सल्लामसलत करून रब्बी हंगामासाठी पीकनिहाय उद्दिष्टे निश्चित करणे, पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निविष्ठांचा पुरवठा सुनिश्चित करणे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब सुलभ करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. रासायनिक घटकांचा वापर कमी करून कृषी-पर्यावरण आधारित पीक नियोजनाला सरकारचे प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :रब्बीकेंद्र सरकारसरकारपीकशेतकरीशेती