Join us

कृषि विज्ञान केंद्र बदनापुर येथे कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन

By रविंद्र जाधव | Published: September 24, 2024 9:34 AM

बदनापूर : भारतामध्ये कृषि विज्ञान केंद्रांची स्थापना होऊन ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे मार्गदर्शना नुसार दिनांक २३ ते २७  सप्टेंबर २०२४  या कालावधीत “कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह” संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत आहे. याचेच औचित्य साधून कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर द्वारे (दि. २३) रोजी ड्रोन प्रातेक्षिक आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

बदनापूर : भारतामध्ये कृषि विज्ञान केंद्रांची स्थापना होऊन ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे मार्गदर्शना नुसार दिनांक २३ ते २७  सप्टेंबर २०२४  या कालावधीत “कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह” संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत आहे. याचेच औचित्य साधून कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर द्वारे (दि. २३) रोजी ड्रोन प्रातेक्षिक आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन माननीय खासदार डॉ. कल्याणराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  जालना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जी. आर. कापसे, सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. आर. डी. अहिरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. एस. डी. सोमवंशी, यांनी सांगितले की, भारतात सर्व प्रथम १९७४ ला पहिले कृषी विज्ञान केंद्र तमिळनाडू कृषी विद्यापीठ अंतर्गत पॉंडिच्चेरी येथे स्थापन करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये सदरील योजनेस ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. करिता कृषि विज्ञान केंद्रांच्या सुवर्ण जयंती निमित्त देशभरातील ७३१ कृषि विज्ञान केंद्रांनी कृषक स्वर्ण समृद्धी हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.

सदरील कार्यक्रमात विविध विषयांचा समावेश असून, त्याचा लाभ संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश कृषि विज्ञान केंद्रांची यशोगाथा प्रदर्शित करणे आणि त्यांची दृश्यता वाढवणे आहे. या कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी पद्धतींशी परिचित करून देणे आणि कृषी तज्ञांशी, सरकारी प्रतिनिधींशी आणि धोरण निर्मात्यांशी सहकार्य करणे आहे. कृषी क्षेत्रातील प्रगती आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करेल.

या मेळाव्यात विविध कृषी क्षेत्रांतील तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, कृषी यंत्रणा, जैविक खते, कीटकनाशके, आणि नवीन पिकांची जाणीव करून देण्यात आली. याशिवाय, कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रदान केले आणि त्यांच्या शंकांची समाधान केले.

खासदार डॉ. कल्याणराव काळे साहेब यांनी आपल्या भाषणात कृषि विज्ञान केंद्रांच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी म्हटले, कृषि विज्ञान केंद्रांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. यामुळे उत्पादन वाढले आहे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

सदरील शेतकरी मेळावा कृषि विभाग, बदनापूर चे तालुका कृषि अधिकारी जी. एम. गुजर आणि इफ्को चे क्षेत्रीय अधिकारी आर.एल. भुजाडे यांच्या सहकार्याने घेण्यात आला. तांत्रिक सत्रात मोसंबी पिकातील फळगळ व्यवस्थापन या विषयावर डॉ. संजय पाटील, प्रभारी अधिकारी मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर यांनी तर हरभरा लागवड तंत्रज्ञान बाबत डॉ. दिपक पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा पैदासकार, कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांनी मार्गदर्शन केले.

कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह च्या निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात जालना जिल्ह्याला मोसंबी पिकाला भौगोलिक मानांकन मिळुन देणारे प्रगतीशील शेतकरी पांडुरंग निवृत्ती डोंगरे, आणि दगडी ज्वारी करिता जय किसान शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून भौगोलिक मानांकन मिळुन देणारे भगवानराव म्हात्रे, कृषी भुषण प्राप्त शेतकरी बारगजे नाना, रायसिंग सुंदर्डे, प्रगतीशील शेतकरी विठ्ठल वैद्य, अशोक सानप, बाबासाहेब मुंढे, जयकिसन शिंदे, सौ. सोनाली खाडे, सय्यद नबी सलीम, बाबासाहेब सावंत, नानासाहेब गुंडे, जगन्नाथराव घाडगे आदींचा सत्कार कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर च्या वतीने करण्यात आला.

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. एल. कदम, विषय विशेषज्ञ, केव्हीके, बदनापूर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. जी. एम. गुजर यांनी केले.

टॅग्स :शेती क्षेत्रजालनाबदनापूरडॉ. कल्याण काळेवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ