Join us

..अन्यथा गॅसचे अनुदान होईल बंद, तुम्ही केली ना इकेवायसी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 3:31 PM

तुम्ही ई-केवायसी केली का? लवकरच करून घ्या नाही तर गॅसचे अनुदान बंद होऊ शकते. 'वन फॅमिली वन गॅस कनेक्शन' या केंद्र शासनाच्या धोरणानुसार...

गॅस जोडणीधारकांना ई- केवायसी करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी असेल तरच अनुदान मिळणार आहे. अन्यथा गॅसचे अनुदान बंद होऊ शकते. आपण सामान्य ग्राहक म्हणून गॅस जोडणी घेतलेली असेल किंवा उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी घेतली असेल तर तुम्हाला केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ई-केवायसी (नो युवर कस्टमर) करणे आवश्यक आहे. यावरून गॅस जोडणी असलेला ग्राहक तोच आहे, याची खात्री पटणार आहे. गॅस अनुदानही ई-केवायसी असेल तरच मिळणार आहे. तुम्ही ई-केवायसी केली का? लवकरच करून घ्या नाही तर गॅसचे अनुदान बंद होऊ शकते.

'वन फॅमिली वन गॅस कनेक्शन' या केंद्र शासनाच्या धोरणानुसार गॅस जोडणी दिली जाते. केंद्र सरकारकडून सामान्य गॅसधारकांना एका सिलिंडरमागे नऊ रुपये, तर उज्ज्वला योजनेतील गॅस सिलिंडरमागे ३०० रुपये सबसिडी मिळते. ग्राहकांची ओळख पटावी, खात्री व्हावी तसेच सबसिडी एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त जोडणीवर जमा होऊ नये या हेतूने ही ई-केवायसी मोहीम राबविली जात आहे. गॅसधारकांनीही स्वतःहून पुढे येऊन ई- केवायसी करून घ्यावी, असे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सबसिडी २०० रुपयांवरून ३०० रुपये मिळणार

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांतून नाराजी पुढे येत होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये शासनाने सिलिंडरमागे २०० रुपये कमी केले. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. विशेष म्हणजे उज्ज्वला योजनेतंर्गत ज्यांच्याकडे गॅस जोडण्या आहेत. त्यांना २०० रुपयांवरून ३०० रुपये अनुदान करण्यात आले. परंतु, हे अनुदान मिळविण्यासाठी ई-केवायसी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. अन्यथा संबंधित लाभार्थ्यास अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

उज्ज्वला'चे अनुदान किती?

गतवर्षी सप्टेंबरमध्ये उज्ज्वला गॅसधारकांना २०० रुपयांची व ऑक्टोबरमध्ये आणखी १०० रुपयांची सबसिडी LPG जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ३०० रुपयांची सबसिडी या योजनेतील गॅसधारकांना मिळते. गॅस सिलिंडर खरेदी करताना ९३० रुपये भरल्यानंतर ३०० रुपयांचे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होते.

ई-केवायसी करणे बंधनकारक

केंद्र शासनाने एका कुटुंबाला एक गॅस कनेक्शन, असे धोरण ठरविले आहे. सबसिडी वितरणात सुलभतेसाठी आता उज्ज्वला अथवा सामान्य सर्वच गैसधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.

...तर अनुदान होईल बंद

प्रत्येक गॅस जोडणीधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. अन्यथा गॅसवरील मिळणारे अनुदान बंद होणार आहे. त्यासाठी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, मोबाइल क्रमांक, गॅस जोडणीची ग्राहक पुस्तिका लागते. तसेच ग्राहकाची फेसरीडिंग किंवा थम्स हे पर्याय आहेत. ही प्रक्रिया तत्काळ करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.

आतापर्यंत किती लाभार्थ्यांनी केली ई-केवायसी?

हिंगोली जिल्ह्यातील गॅस जोडणीधारकांपैकी जवळपास निम्मे लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली आहे. उर्वरित गॅसधारकांनीही ई-केवासयी करावे, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :गॅस सिलेंडरसरकारसरकारी योजना