Join us

Paddy Crop Management : भातपिकावर 'या' विविध रोगांचा प्रादुर्भाव; शास्त्रज्ञांनी पाहणी करून सांगितला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 2:30 PM

भात पिकांवर करपा व तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. याबाबतचे वृत्त 'लोकमत अ‍ॅग्रो' मध्ये प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने दौरा करुन पाहणी करून आदिवासी भात उत्पादकांना उपाय योजना सुचविल्या.

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोऱ्यांत भात पिकांवर करपा व तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. याबाबतचे वृत्त 'लोकमत अ‍ॅग्रो' मध्ये प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने दौरा करुन पाहणी करून आदिवासी भात उत्पादकांना उपाय योजना सुचविल्या.

पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्राच्या ६३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भात लागवड केली जाते. दोन आठवड्यांपासून या भागामध्ये पाऊस होत आहे. त्यामुळे दाट धुके व भात पिकासाठी प्रतिकूल वातावरण तयार झाले आहे.

याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, संजय गवारी, शरद बँकेचे संचालक प्रदीप आमुंडकर, मंडल कृषी अधिकारी रामचंद्र बारवे, कृषी पर्यवेक्षक चंद्रकांत डामसे, प्रकाश आंबेकर व कृषी सहाय्यक रविंद्र पारधी, युवराज बांबळे, अरविंद मोहरे, उत्तम लोहकरे आणि दीपक सुपे रोहिदास विरणक व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

प्रशासनाने उपाय योजना सुचविल्या

■ कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे म्हणाले, ऑक्टोबर हिट ही साधारणतः ऑक्टोबर महिन्यात येते, परंतु यावर्षी सप्टेंबर मध्ये उष्णता वाढल्याने भात पिकावर स्थानिक वाणामध्ये करप्याचे प्रमाण दिसून येत आहे. सध्याच्या स्थितीत पाऊस सुरू झाल्याने करपा प्रमाण कमी होईल.

■ अशा वातावरणामुळे भात पिकांवर करपा तांबेरा व खोड किडा रोगाचा प्रादुर्भाव होऊन पीक जळू लागली आहेत. भातरोपांची पाती पिवळी पडत आहेत. तांबेरा रोगांमध्ये रोपांची पाती तांबडी पडून सुकत आहेत. खोडाच्या रोगामध्ये किडा हा रोपाच्या मुळामध्ये शिरून पूर्ण भातरोप पोखरत आहे. प्रशासनाने दौरा करुन पाहणी करून आदिवासी भात उत्पादकांना उपाय योजना सुचविल्या.

रोगाच्या नियंत्रणाकरिता रासायनिक पद्धतीमध्ये फवारणी करताना प्रतिलिटर पाणी कॉपर ऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम या प्रमाणात फवारणी करावी. रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच जैविक पद्धतीमध्ये फवारणी करताना प्रतिलिटर पाणी ट्रायकोडर्मा व्हीरीडी १ ग्रॅम फवारणी करावी. - डॉ. दत्तात्रय गावडे, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्राचे नारायणगाव.

आमच्याशी व्हॉटअप्पद्वारे जोडण्यासाठी 'या' लिंक वर क्लिक करा.

टॅग्स :भातशेतीशेतकरीपाऊसपीक व्यवस्थापनकीड व रोग नियंत्रणशेती क्षेत्र