Join us

Paddy Harvesting : दिवाळीच्या लगबगीत पश्चिम घाटात भात काढणीला वेग!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 3:20 PM

मागील दोन आठवड्यापासून पश्चिम घाटातील भाताच्या काढणीला वेग आला आहे.

Pune :  पुणे आणि पश्चिम घाट परिसरातील भाताच्या काढणीला मागील दोन आठवड्यापासून सुरूवात झालेली आहे. दिवाळीच्या लगबगीमध्ये सध्या शेतकरी भाताची काढणी करत आहेत. तर पुढील दोन ते तीन आठवड्यापर्यंत या काढणी शेवटच्या टप्प्यात असतील असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी मान्सूनोत्तर पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक भात खाचरात पाणी साठलेले आहे. परिपक्व झालेला भात अजूनही हिरवाच असल्यामुळे शेतकऱ्यांना काढणीला उशीर होत आहे. अन्यथा दसऱ्यापर्यंत भाताची काढणी आवरत आलेली असते. पण सध्या दिवाळीनंतर दोन आठवडे काढणी चालू असेल असे चित्र आहे. 

पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाटात इंद्रायणी भाताचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्याचबरोबर काळा भात आणि इतर वाणांचीसुद्धा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. वासाचा इंद्रायणी ही मावळ आणि भोर-वेल्हा-मुळशी तालुक्याची ओळख आहे. येणाऱ्या महिन्याभरात सर्व भाताची  काढणी उरकून हा भात विक्रीसाठी तयार होणार आहे.

तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भावमागील काही दिवसांत मावळ आणि भोर तालुक्यातील डोंगर परिसरात तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकरी भाताची लवकर काढणी करत आहेत. भाताच्या खोडावर हे कीटक रसशोषण करत असल्यामुळे यावर प्रतिबंधात्मक उपाय प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे काढणीलाच शेतकरी प्राधान्य देतात.  

टॅग्स :शेती क्षेत्रभातपुणे