Lokmat Agro >शेतशिवार > Pandharpur Vari: पंढरीच्या वाटेवर भक्तीचा महापूर, संतांच्या प्रमुख पालख्या विठुरायाच्या नगरीत दाखल

Pandharpur Vari: पंढरीच्या वाटेवर भक्तीचा महापूर, संतांच्या प्रमुख पालख्या विठुरायाच्या नगरीत दाखल

Pandharpur Vari: ‌Dindi and Palkhi reached Pandharpur for Ashadhi Ekasashhi | Pandharpur Vari: पंढरीच्या वाटेवर भक्तीचा महापूर, संतांच्या प्रमुख पालख्या विठुरायाच्या नगरीत दाखल

Pandharpur Vari: पंढरीच्या वाटेवर भक्तीचा महापूर, संतांच्या प्रमुख पालख्या विठुरायाच्या नगरीत दाखल

Pandharpur Vari on Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सालाबादप्रमाणे प्रमुख दिंड्यांचे पंढरपुरात आगमन झाले असून पंढरी नगरीत चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण आहे.

Pandharpur Vari on Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सालाबादप्रमाणे प्रमुख दिंड्यांचे पंढरपुरात आगमन झाले असून पंढरी नगरीत चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Pandharpur Vari on Ashadhi Ekadashi संत ज्ञानेश्वर महाराज पालखीने शनिवारी वेळापूरचा मुक्काम आटोपून सकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. आळंदी ते पंढरपूर या मार्गावर वेळापूर ते पंढरपूर हा सर्वांत मोठा प्रवासाचा टप्पा पूर्ण करत दुपारी पाचच्या दरम्यान पिराचीकुरोली टप्पा येथे आगमन झाले. तर तुकोबांच्या पालखीने (Sant Tukoba) बोरगावकरांचा पाहुणचार स्वीकारत बोंडल्याच्या माळरानावर ‘तुका म्हणे धावा आता, आहे पंढरी विसावा’ हा धाव्याचा अभंग आळवीत पंढरपूरच्या दिशेने धावा केला. त्यानंतर संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूर तालुक्यातील पहिले मुक्कामाचे ठिकाण असलेल्या पिराची कुरोली पालखी तळावर आगमन झाले. येथे ग्रामस्थांच्या वतीने तोफांची सलामी देऊन पालख्यांचे स्वागत करण्यात आले.

भंडीशेगाव पालखी तळावरही संत ज्ञानोबांच्या (Sant Dnyaneshwar)पालखीचे आगमन होताच भंडीशेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत कमानी उभारत तोफांची सलामी देऊन स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या यामुळे पालखीतील भाविक तल्लीन झाले होते.

वारकरी चिंब.. 
रविवारी ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने वेळापूर तर संत तुकोबांच्या पालखीने बोरगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केल्यानंतर अधूनमधून रिमझिम पाऊस पडत होता. ऊन, सावली, पाऊस आशा आल्हाददायी वातावरणात ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करीत वारकरी पावसाबरोबर भक्तिरसात चिंब झाले होते.

आषाढी वारीसाठी संत निवृत्तीनाथ महाराज, संत एकनाथ महाराज, संत निळोबाराय, संत जनार्दन स्वामी, संत मुक्ताबाई, समर्थ किसनगिरी बाबा, साईबाबा, शनेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यांसह विविध छोटे-मोठे पालखी सोहळे व दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून लाखो वारकरी करकंबवरून व मुक्काम करून जात आहेत.

शिवाय जळोली चौक येथे संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यावर तर सोमवार पेठ येथे संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यावर जेसीबीने फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत केले जात आहे. सार्वजनिक मंडळे व नागरिक आपापल्या परीने वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था करीत आहेत.

अनेक ठिकाणी नाश्ता व चहापाण्याची सोय करून वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली जात आहे. मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन, भारुड तसेच हरीजागराने करकंब नगरी दुमदुमून गेली असून मिनी पंढरीचे स्वरूप आले आहे. अशातच मागील दोन दिवसांपासून टेंभुर्णी ते पंढरपूर मार्गावरून हातात पताका घेऊन टाळ-मृदुंगाच्या तालात ‘माउली-तुकाराम’चा जयघोष करीत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू असल्याने रस्ता दुतर्फा वारकरीमय झाला आहे. याशिवाय प्रत्येक गावांमध्ये वारकऱ्यांना राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली. प्रत्येकजण आपापल्या परीने वारकरी सेवा बजावताना दिसले.

Web Title: Pandharpur Vari: ‌Dindi and Palkhi reached Pandharpur for Ashadhi Ekasashhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.