Join us

Sugarcane Disease उत्तर प्रदेशात ऊस उत्पादकांमध्ये या रोगाची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:23 AM

कॅन्सर हा फक्त प्राण्यांनाच होतो असे नाही तर तो पिकांनाही होतो, असे स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेशातील ०२३८ जातीच्या उसाला कॅन्सरसदृष्य रेड रॉट या रोगाची लागण झाल्याने तेथील ऊस उत्पादक हादरले आहेत.

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : कॅन्सर हा फक्त प्राण्यांनाच होतो असे नाही तर तो पिकांनाही होतो, असे स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेशातील ०२३८ जातीच्या उसाला कॅन्सरसदृष्य रेड रॉट या रोगाची लागण झाल्याने तेथील ऊस उत्पादक हादरले आहेत.

मराठीत तो एक प्रकारचा तांबेराच आहे. मात्र यामुळे उसाच्या उत्पादनात मोठी घट होत असल्याने शेतकरी अन्य पिकांकडे वळले आहेत. रेड रॉट आणि इतर कारणांनी २०२२-२३ च्या हंगामाच्या तुलनेत २०२३-२४ च्या हंगामात ऊस लागवडीखालील क्षेत्रात २ लाख ६७ हजार हेक्टरनी घट झाली आहे.

उत्तर प्रदेश ऊस आणि साखर उत्पादनातील क्रमांक एकचे राज्य. मात्र हा क्रमांक यंदा या राज्याने गमावला आहे. त्याला कारण उसाला झालेला हा कॅन्सर आहे. प्रामुख्याने ०२३८ या जातीचा ऊस या रोगाला बळी पडत आहे.

राज्यात याच जातीच्या बेण्याची लागण मोठ्या प्रमाणात होते. मात्र गेल्या एकदोन वर्षांपासून उसावर रेड रॉट या कॅन्सरसारख्या रोगाची लागण होऊ लागली. त्यावर प्रभावी औषधही नाही. यामुळे उसाची वाढ खुंटतानाच वजन आणि उताराही कमी येऊ लागला.

परिणामी उत्पादनखर्चही निघणे मुश्किल होऊ लागले. यामुळे शेतकऱ्यांनी या जातीच्या उसाची लागण करणे बंद करुन अन्य पिके घेण्यास सुरुवात केली आहे.

पंजाब, हरयाना, बिहारमध्येही फटकाउत्तर प्रदेश प्रमाणेच बिहार, बंजाब हरयाना आदी राज्यांतील ०२३८ जातीच्या उसावर रेड रॉटची लागण होत आहे. तेथेही शेतकरी या जातीच्या उसाऐवजी अन्य जातीच्या उसाची लागण करीत आहेत. किंवा अन्य पिकांकडे वळत आहेत.

कालबाह्य बेणे सीओ ०२३८ ही उसाची नवी जात २०१२ मध्ये लागणीसाठी देण्यात आली. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली. या जातीचे बेणे दहा वर्षांपर्यंत लागणीची शिफारस होती. मात्र शेतकरी तेच तेच बेणे वापरू लागल्याने या जातीचा ऊस रेड रॉटला बळी पडला आहे.

ऊसाच्या इतर जातीसीओ ०२३८ बरोबरच उत्तर प्रदेशात ०११८, १३२३५, १५०२३, १४२०१, ५००९, १७२३१, ८२०२३, २१९ या जातीच्या उसाची लागणही केली जाते. मात्र त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. रेड रॉटचा फटका बसल्यानंतर आता इतर जातींच्या उसाची लागण करा, असे कारखानदार आणि राज्यातील कृषी विभागाकडून सांगण्यात येऊ लागले आहे.

अशी झाली घट

हंगामउसाखालील क्षेत्र (लाख हेक्टर)उसाचे उत्पादन (लाख टन)साखर उत्पादन (लाख टन)
२०२२-२३२७.९५२२४२.४६१०४.८२
२०२३-२४२५.२८२०५६.२६१०३.६०

अधिक वाचा: Sugarcane FRP १२७ कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी जमा, उरलेले ८० कारखाने कधी देणार?

टॅग्स :ऊसउत्तर प्रदेशशेतकरीशेतीकीड व रोग नियंत्रणकर्करोग