पपई हे फळ माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त समजले जाते. याचे कारण पपईमध्ये व्हिटॅमिनचे प्रमाण मोठे आहे. या फळामध्ये शरीराच्या आरोग्याकरिता अनेक उपयुक्त घटक आहेत. हे फळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला होणारे फायदे पुढील प्रमाणे आहेत.
कोलेस्टरॉल कमी होते
कोलेस्टरॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात चांगलेच वाढू लागले आहे. त्यामुळे कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसून येतो. पपईमध्ये शरीरातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी करण्याचे गुणधर्म आहेत. फायबर, व्हिटॅमिन सी आणि अॅन्टऑक्सिडंटस् यांचे पपईमधील प्रमाण मोठे आहे. त्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्टरॉल जमा होऊ शकत नाही. कोलेस्टरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरावर कसे दुष्परिणाम होतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे पपई खाल्ल्यामुळे कोलेस्टरॉल कमी होणार असेल तर हे फळ खाल्लेच पाहिजे.
वजन कमी होते
वजन वाढल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तींनी आपल्या आहारात पपईचा समावेश केलाच पाहिजे. पपईमधील कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असते. त्याचबरोबर यातील तंतूमय पदार्थांमुळे आपली पचनशक्ती चांगली राहाते. त्याचा परिणाम आपले वजन कमी होण्यात होतो.
प्रतिकारशक्ती वाढते
आपल्याला प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे अनेक आजारांना बळी पडावे लागण्याची शक्यता असते. अशा संसर्गजन्य आजारांपासून शरीराचे संरक्षण करण्याचे काम पपईमुळे होते. पपईतील व्हिटॅमिन सी मुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. प्रतिकारशक्ती चांगली झाल्यामुळे अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात.
पचनशक्ती वाढते
पचनशक्ती बिघडल्यामुळे किंवा पचनशक्ती चांगली नसल्यामुळे आपल्याला अनेक रोग किंवा व्याधी होण्याची शक्यता असते. याचे कारण सर्व रोगांचे, आजारांचे, व्याधींचे मूळ अपचनात दडले आहे. सध्याच्या आधुनिक जीवनशैलीत आपण जंकफूडच्या आहारी जाऊ आलो आहेत. जंकफूडमधील तेलाचे प्रमाण अन्य पदार्थ यामुळे आपली पचनशक्ती बिघडू शकते. अशा आहारामुळे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम कमी करायचे असतील तर दररोज एक पपई खावी असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पपईमध्ये फायबरचे प्रमाण मोठे असते. याशिवाय यामध्ये पपाईन नावाचे एन्झाइम असते. या पपाईन नावाच्या एन्झाइममुळे आपली पचनशक्ती चांगली राहाते.
गुणकारी पपई
• मधुमेह झालेल्या रूग्णांकरिता पपई हे चांगले फळ आहे. हे फळ जरी गोड असले तरी यातील साखरचे प्रमाण फारच कमी असते. ज्यांना मधुमेह नाही अशा व्यक्ती पपई नियमित खाऊन स्वतःला मधुमेह होण्यापासून दूर ठेवू शकतात.
• पपईमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे आपली दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. अनेकांना वय वाढल्यावर कमी दिसू लागते, अस्पष्ट दिसू लागते. अशा व्यक्तींनी पपई खाल्ल्यास त्यांची दृष्टी सुधारू शकते.
• वय वाढल्यानंतर आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे किंवा वय वाढल्याची लक्षणे शरीरावर दिसणे हे पपई खाल्ल्यामुळे कमी होऊ शकते. पपईमुळे चेहऱ्यावर रिंकल्स किंवा सुरकुत्या येत नाहीत.
• पपईमध्ये अॅन्टीऑक्सिडंटस्चे प्रमाण मोठे असल्याने हे फळ कॅन्सरला प्रतिबंध करते असे वैद्यकीय संशोधनात दिसून आले आहे.
• अतिश्रमामुळे शरीरावर आणि मनावर येणारा ताण कमी करण्याचे काम पपईमुळे होते. दमूनभागून घरी आल्यानंतर दररोज एक प्लेट पपई खाल्ल्यावर आपल्या शरीरावर येणारा ताण दूर होऊ शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ आलबामाने केलेल्या एका पाहाणीत असे दिसून आले आहे की, पपईमधील व्हिटॅमिन सी मुळे आपल्या शरीरावरील आणि मनावरील ताण दूर होऊ शकतो.
हेही वाचा : Brown Rice : उत्तम आरोग्याची हमी असलेला आरोग्यदायी ब्राऊन राईस