राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचे उत्पादन वाढविण्याकरता शेतकऱ्यांमध्ये चुरस निर्माण व्हावी यासाठी जिल्ह्यात पीक स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. चालु वर्षात खरीप हंगाम २०२३ मध्ये राज्यातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या प्रमुख पिकांच्या पीक स्पर्धा राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिके अंतर्गत जिल्ह्या मध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठीचे निकष :
- स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रति अर्ज रु. ३००/- एवढी शुल्क लागू राहील.
- एक शेतकरी एका पेक्षा अधिक पिकासाठी अर्ज करून स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.
- पिकस्पर्धेमध्ये पिकाची निवड करतांना पिक निहाय तालुक्यातील संबंधित पिकाखालील क्षेत्र किमान १००० हेक्टर असावे.
- ज्या पिकासाठी शेतकऱ्यांना अर्ज सादर करावयाचे आहेत, त्या पिकाखालील क्षेत्र कमीत कमी १० आर वर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
- किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी १० व आदीवासी गटासाठी ५ असेल.
- स्पर्धेत भाग घेताना शेतकऱ्याकडे त्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असली पाहिजे व ती जमीन स्वतः कसत असला पाहिजे.
- पिक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र-अ) भरून ठरवून दिलेले प्रवेश शुल्क व ७/१२, ८-अ चा उतारा, आधार कार्ड व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची करून अर्ज शुल्कासह संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जमा करावी.
- तालुका पातळीवरील पिक स्पर्धेसाठी सर्व इच्छुक शेतकऱ्यांना भाग घेता येईल.
- तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर पिकनिहाय विजेत्यांना प्रथम क्रमांक आलेल्या पातळी व त्याखालील पातळीवर संबंधित पिकासाठी पुढील ५ वर्ष सहभाग घेता येणार नाही.
स्पर्धक पातळी आणि गटनिहाय बक्षिसे
तरी राज्यातील शेतकऱ्यांनी सदरील पीक स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा खरीप हंगामात उडीद व मुग पिकासाठी पीक स्पर्धेत अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०२३ देण्यात आलेली आहे. तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सो्ाबीन, भुईमुग व सुर्यफुल इ. पिकांसाठी पीक स्पर्धेत अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ देण्यात आलेली आहे. अंतिम तारखेपूर्वी पिक स्पर्धेचा अर्ज शुल्कासहित सादर करून जास्तीत जास्त शेतकन्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी आपले कृषि सहाय्यक, मंडल कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.