राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदावर पाशा पटेल यांची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. भाव मिळत नसल्याची ओरड राज्यभर होत असताना राज्य शासनाकडून हा निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव शेतकऱ्यांच्या शेतमालाला किफायतशीर भाव तसेच ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा यासाठी राज्य कृषी मूल्य आयोग स्थापन करण्यात आला आहे. कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती दुसऱ्यांदा झाली असून २०१७ मध्येही ते अध्यक्ष होते.
खरीप हंगामाचे हमीभाव जाहीर झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना पीकपेऱ्यात बदल होईल अशी अपेक्षा असते.जाहीर केलेल्या हमीभावानुसार शेतमाल खरेदीची यंत्रणा उभी करण्यासाठी सरकारवर अंकुश ठेवण्याचे कामही या आयोगाचे असते. गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पाशा पटेल यांच्यावर पुन्हा एकदा कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, ही निवड राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मुळे झाली आहे. या नियुक्तीसाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्तिशः श्रेष्ठीच्या निदर्शनास आणून, पाठपुरावा करून नियुक्ती साठी प्रयत्न केले.
मागच्या वेळेस राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात खाद्यतेल व डाळी यांच्या बाजारभावात वाढीसाठी आयात निर्यात धोरणात आवश्यक बदल करण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयुष गोयल, तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या निदर्शनास आणून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न पाशा पटेल यांनी केला होता.