Join us

Pashu Ganana 2024 : यंदा पशुगणना होणार मोबाइलवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:55 PM

Pashu Ganana 2024 : सप्टेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या २१ व्या पशुगणनेची तयार सध्या पशुसंर्वधन विभाग करत आहे. त्याची सविस्तर माहिती वाचूया.

Pashu Ganana 2024 :

सप्टेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या २१ व्या पशुगणनेसाठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. यंदा प्रगणकांना मोबाइलवर पशुधनाची माहिती भरावी लागणार आहे. त्यासाठी शासन प्रगणकांना मानधन, मोबाइल वापराचा वेगळा मोबदला दिला जाईल.पशुगणनेंतर्गत ग्रामीण भागात ४ लाख ८३ हजार ९०३, तर मनपा व नगरपालिका या शहरी भागात ६ लाख ५१ हजार ४४८, अशा एकूण ११ लाख ३५ हजार ३५१ कुटुंबांचे सर्वेक्षण ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.मागील २० वी पशुगणना २०१९ मध्ये झाली होती. वास्तविक, ती २०१७ मध्ये होणे अपेक्षित होते. २० व्या पशुगणनेत ११ लाख ६३ हजार ७४ पशुधनाची संख्या समोर आली होती. आता १ सप्टेंबरपासून २१ वी पशुगणनेच्या कामाला सुरुवात होईल. जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहीम राबविली जाते. जिल्ह्यात ग्रामीण भागात १ हजार ४१६ गावांसाठी १६८ प्रगणक व ३५ पर्यवेक्षक, तर मनपा व नगरपालिकांच्या शहरी भागात एकूण २३१ वॉर्डासाठी ६८ प्रगणक व १७ पर्यवेक्षक, असे एकूण २३६ प्रगणक व ५२ पर्यवेक्षक नेमले आहेत.पशुगणनेमुळे जिल्ह्यातील जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट होणार आहे. त्यानुसार शासनाला पशुधनासाठी धोरण निश्चित करणे, योजना आखणे सोपे होणार आहे.

आता मोबाइलवर५ वर्षांपूर्वी पशुगणना झाली होती तेव्हा प्रगणकांना टॅब दिले. त्यावर माहिती भरून घेतली होती. आता प्रगणकांना मोबाइलवर पशुधनाची माहिती भरावी लागेल. प्रगणकांना मानधन, मोबाइल वापराचा वेगळा मोबदला दिला जाईल, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी.डी. झोड यांनी सांगितले.

या मोहिमेत या जनावरांची गणनागाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह यांची गणना केली जाणार आहे. मागच्या पशुगणनेत जिल्ह्यात गाय वर्ग- ५ लाख ३८ हजार ५७२, म्हैस वर्ग- ९४ हजार ४३०, शेळ्या- ४ लाख ३१ हजार १८२, मेंढ्या ८८ हजार २४४, वराह- १० हजार ६४६, असे एकूण ११ लाख ६३ हजार ७४ पशुधन गणना झाली होती. 

टॅग्स :शेती क्षेत्रप्राण्यांवरील अत्याचारगाय