Join us

उन्हापासून आंबा फळ वाचविण्यासाठी पाटणच्या शेतकऱ्याने केला हा अनोखा प्रयोग; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 13:21 IST

वातावरणातील बदलाचा परिणाम फळबागांवर होऊ लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी प्रचंड प्रमाणात आलेला मोहर आणि कैऱ्यांनी लदबदलेली झाडे आता मोकळी होऊ लागल्याने याचा परिणाम आंबा उत्पादनावर होणार आहे.

रवींद्र मानेढेबेवाडी : वातावरणातील बदलाचा परिणाम फळबागांवर होऊ लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी प्रचंड प्रमाणात आलेला मोहर आणि कैऱ्यांनी लदबदलेली झाडे आता मोकळी होऊ लागल्याने याचा परिणाम आंबा उत्पादनावर होणार आहे.

आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मात्र, उरलेली फळे रोगांना बळी पडू नयेत, यासाठी आंब्यांच्या फळांना कागदी पिशव्यांचे आवरण घालून आंबा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे.

दरम्यान, फळबागांच्या उत्पादनावरच आर्थिक गणित अवलंबून असणाऱ्या कुटुंबांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ढेबेवाडी विभागातील बहुतेक डोंगर पठारावरील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागा आहेत.

फळबाग लागवड योजनेने आंबा लागवडीत वाढ◼️ अनेक शेतकऱ्यांकडून शेताच्या बांधांवर आंब्याची झाडे लावून त्या माध्यमातून उत्पादन घेतले जाते. हिंस्र प्राण्यांकडून शेतीचे नुकसान आणि पावसाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांनी फळबागांचा आधार घेतला आहे.◼️ फळबाग लागवड योजनेतून अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, आंबा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. देशी प्रजातीच्या आंब्यासह हापूस आणि पायरी जातीच्या आंबा उत्पादनास येथील वातावरण पोषक आहे.

आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचा सडायावर्षी चांगल्या पद्धतीने आलेला मोहर आणि त्या माध्यमातून लदबदलेल्या कैऱ्या सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे गळून पडत आहेत. यामुळे आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडलेला दिसून येत आहे. येथील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून निर्माण केलेल्या या फळबागांना आता कुठे उत्पादन चालू झाले असून, शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होण्याची चिन्हे दिसत असतानाच वातावरणाने अडचणीत वाढ झाली.

पेरूच्या जाळी आता आंब्याला बसविल्यासातारा जिल्ह्यात मोठ्या पेरूला एक विशिष्ट प्रकारच्या जाळ्या बसविण्याची पद्धत कोरोनानंतर आली आहे. त्याच प्रकारच्या जाळी या शेतकऱ्याने आंब्यालाही आवरण म्हणून लावल्या आहेत. काहीही करुन नुकसान कमी करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे.

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आणि त्यातच बदलते वातावरण यामुळे आंबा उत्पादक मोठ्या संकटात सापडला आहे. रात्री थंडी दिवसा कडक ऊन यामुळे आंबा उत्पादनासाठी पोषक वातावरण मिळत नसल्याने यावर्षी आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. - सूर्यकांत काळे, आंबा उत्पादक शेतकरी, काळगाव

अधिक वाचा: आंब्यातील फळकुज, साका आणि फळमाशीसाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

टॅग्स :आंबाशेतकरीशेतीतापमानफळेफलोत्पादनकृषी योजनाकीड व रोग नियंत्रण