Join us

२१० रुपयांचा हप्ता भरा अन् दरमहा ५ हजार पेन्शन मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 9:04 PM

अटल पेन्शन योजना या योजनेअंतर्गत वय वर्षे १८ ते ४० पर्यंतच्या नागरिक, सरकारी, निम सरकारी कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतात.

केंद्र शासनामार्फत अटल पेन्शन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वय वर्षे १८ ते ४० पर्यंतच्या नागरिक, सरकारी, निम सरकारी कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर महापालिकेतर्फे केले आहे.

या योजनेमध्ये कमीत कमी दरमहा ४२ रुपये व जास्तीत जास्त २१० रुपये हप्ता भरणे आवश्यक आहे. या योजनेतून वय वर्षे ६० नंतर दरमहा पेन्शन सुरू होते. या योजनेमध्ये दरमहा तिमाही, वार्षिक हप्ता जमा करु शकतात. या योजनेचा लाभ पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयीकृत बँकांमधून सर्वांना मिळू शकतो.

अशी असेल पेन्शन व हप्तादरमहा १००० रुपयेपेन्शनसाठी दरमहा ४२ रुपये हप्ता मृत्यूनंतर मिळणारी रक्कम एक लाख सात हजारदरमहा २००० रुपयेपेन्शनसाठी ८४ रुपये हप्ता, मृत्यूनंतर मिळणारी रक्कम तीन लाख चार हजारदरमहा ३००० रुपयेपेन्शनसाठी १२६ रुपये हप्ता, मृत्यूनंतर मिळणारी रक्कम पाच लाख एक हजारदरमहा ४००० रुपयेपेन्शनसाठी १६८ रुपये हप्ता, मृत्यूनंतर मिळणारी रक्कम सहा लाख सात हजारदरमहा ५००० रुपयेपेन्शनसाठी २१० रुपये हप्ता, मृत्यूनंतर मिळणारी रक्कम आठ लाख पाच हजार

यासाठी शेतकरी बांधव आपणही सहभागी होऊ शकता. अधिक माहितीसाठी आपल्या जवळील राष्ट्रीयकृत बँक किंवापोस्ट ऑफिस मध्ये संपर्क साधावा.

टॅग्स :निवृत्ती वेतनशेतकरीपैसापोस्ट ऑफिसबँक