Lokmat Agro >शेतशिवार > Pesticides Awareness : शेतकऱ्यांनो! फवारणी करताना घ्या काळजी

Pesticides Awareness : शेतकऱ्यांनो! फवारणी करताना घ्या काळजी

Pesticides Awareness: Farmers! Be careful when spraying | Pesticides Awareness : शेतकऱ्यांनो! फवारणी करताना घ्या काळजी

Pesticides Awareness : शेतकऱ्यांनो! फवारणी करताना घ्या काळजी

Pesticides Awareness : पिकांवर फवारणी करताना काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. जाणून घेऊ या काय काळजी घ्यायची.

Pesticides Awareness : पिकांवर फवारणी करताना काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. जाणून घेऊ या काय काळजी घ्यायची.

शेअर :

Join us
Join usNext

Pesticides Awareness : 

गणेश निरस : 

काही दिवसांपासून पावसामुळे आंतरमशागतींच्या कामाला ब्रेक लागला होता. मात्र, आता अनेक भागांत उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची लागबग सुरू झाली आहे. मात्र, वातावरण बदलाचा पिकांवर विपरीत • परिणाम होत असल्याने कीडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे आता कृषी विभागकडून फवारणी डब्ब्यासंदर्भात जनजागृती अभियान राबविणे गरजेचे आहे. 
 कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून विविध कीटकनाशकांची फवारणी करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, फवारणी करताना शेतकरी, मजुरांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कीटकनाशकांचा अतिविषारी, विषारी, बिनविषारी या तीन प्रकारात समावेश होतो. यातील लाल स्टिकर असलेला डब्बा विषारी असून, फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक वापरणे गरजेचे आहे.

अन्यथा जनावरांना होईल धोका
• फवारणी करताना किटकनाशक तोंडात जाऊ नये यासाठी तोंडाला कपड्याने बांधून घ्यावे.
•  किटकनाशकाचे मिश्रण हाताने ढवळू नये. ज्या भागात फवारणी केली, त्या भागात किमान आठ दिवस जनावरे सोडू नयेत. उपाशीपोटी फवारणी न करता न्याहारी करून करावी.

काय काळजी घ्यावी?
• कीटकनाशक औषध हाताला किवा शरीराच्या इतर भागाला लागणार नाही याची काळजी घ्यावी. ते तोंडात गेले तर तत्काळ जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लाल स्टिकरचा डब्बा सर्वाधिक विषारी
• फवारणी करताना विषबाधा झाल्यास घरगुती उपचार न करता तत्काळ रुग्णालयात दाखल करावे. जेणेकरून वेळेत उपचार मिळतील. लालचिन्ह असलेला डब्बा सर्वाधिक विषारी अतिविषारी, विषारी आणि कमी विषारी असे तीन प्रकार कीटकनाशकात आहेत.
यात लाल स्टीकर असलेला डब्बा सर्वाधिक विषारी असतो. हे कीटकनाशक अत्यंत काळजीपूर्वक वापरावे लागते. फवारणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

सापांचाही वावर वाढला
पावसाचे पाणी जमिनीत घुसून शेतशिवारात सरपटणाऱ्या या प्राण्यांची बिळे बंद होत आहेत. बिळे बंद झाल्यामुळे साप हे धुरे-बांधावरील गवतात, शेतातील पिकात लपत असतात. सोयाबीनच्या पिकांमध्ये सापांचा वावर जास्त वाढलेला आढळतो. 
यामुळे पिकात खुरपणी, फवारणी करताना शेतकरी, शेतमजुरांनी काळजी घेणे आवश्यक आहे. नजर चुकीने सापावर पाय पडला, हात लागल्यावर सापाने दंशानंतर तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे. 
पिकात खाली वाकू नये, साप दिसताच त्याला न डिवचता सर्पमित्राला संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

Web Title: Pesticides Awareness: Farmers! Be careful when spraying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.