महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 'सामाईक प्रवेशपरीक्षा- २०२३' चे आयोजन केले आहे. राज्यातील चारही विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध विद्याशाखांमध्ये पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा राज्यातील सहा केंद्रांवर येत्या दि. २९ ऑक्टोबर रोजी परीक्षा पार पडणार आहे. कृषी विद्याशाखेचे पदव्युत्तर विद्यार्थी तसेच २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची अंतिम सत्र परीक्षा देणारे विद्यार्थी पात्र राहणार आहेत.
सामाईक प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणे तसेच अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी http://www.mcaer.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. परीक्षेसाठी दि. २३ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येईल तसेच दि. २४ ऑगस्टपर्यंत परीक्षा शुल्क भरता येणार आहे. दि. १७ ऑक्टोबरपासून परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध होणार आहेत. परीक्षेचा निकाल ८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा मंडळाच्या वतीने देण्यात आली.
कृषी विद्यापीठातर्फे पीएच. डी. प्रवेश परीक्षेचे आयोजन, 'इथे' करता येणार अर्ज
महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 'सामाईक प्रवेश परीक्षा - २०२३' चे आयोजन ...
महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 'सामाईक प्रवेश परीक्षा - २०२३' चे आयोजन ...
Join usNext