Lokmat Agro >शेतशिवार > कापसावरील किडींसाठी कमी खर्चातील उपाय कामगंध सापळा

कापसावरील किडींसाठी कमी खर्चातील उपाय कामगंध सापळा

Pheromone trap low cost solution for cotton pests | कापसावरील किडींसाठी कमी खर्चातील उपाय कामगंध सापळा

कापसावरील किडींसाठी कमी खर्चातील उपाय कामगंध सापळा

एकात्मिक कीड व्यवस्थापनात कामगंध सापळ्याचा वापर हा एक महत्वाचा भाग आहे. त्याचे दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. शत्रू किडींच्या आगमनाचे वेळीच संकेत मिळणे आणि नर पतंगाचा नायनाट करून किडींची संख्या शेतामध्ये कमी करणे.

एकात्मिक कीड व्यवस्थापनात कामगंध सापळ्याचा वापर हा एक महत्वाचा भाग आहे. त्याचे दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. शत्रू किडींच्या आगमनाचे वेळीच संकेत मिळणे आणि नर पतंगाचा नायनाट करून किडींची संख्या शेतामध्ये कमी करणे.

शेअर :

Join us
Join usNext

कीटकनाशकांच्या अति, अवास्तव आणि अविचारी वापरामुळे निरनिराळे दुशापरिणाम समोर आले आहेत. त्यावर उपाय म्हणून एकात्मिक कीड व्यवस्थापन हि संकल्पना पुढे आली आहे. ज्यामध्ये रासायनिक किटकनाशाकाचा कमीत कमीत आणि चातुर्याने वापर करून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धती उदा. मशागती द्वारे, कीड प्रतिकारक वाणाचा वापर, यांत्रिक भौतिक, जैविक कीड नियंत्रण इत्यादी पद्धतीचा संयुक्तिक वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेऊन त्यापासून होणारे नुकसान टाळून वातावरणाचा समतोल राखल्या जातो.

एकात्मिक कीड व्यवस्थापनात कामगंध सापळ्याचा वापर हा एक महत्वाचा भाग आहे. त्याचे दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. शत्रू किडींच्या आगमनाचे वेळीच संकेत मिळणे आणि नर पतंगाचा नायनाट करून किडींची संख्या शेतामध्ये कमी करणे. कापसावर बोंडअळयामुळे जवळपास ५०-५५ टक्के नुकसान होते. यामध्ये ठिपकेदार, अमेरिकन आणि शेंदरी बोंडअळी या मुख्य बोंडअळीयाचा सहभाग आहे.

कामगंध सापळा म्हणजे काय ?

पतंगवर्गीय किटकामध्ये (Lepidoptera) मादी आणि नर यांचे मिलन होण्यासाठी एका विशिष्ठ प्रकारच्या गंधाची आवश्यकता असते. काही कीटकांच्या प्रजातीमध्ये नर हा आपल्या शरीरातून कामगंध सोडून स्वजातीय मादीस आकर्षून घेतात. तर काहीमध्ये मादी नराला आकर्षून घेण्यासाठी आपल्या शरीरातून गंध सोडते आणि नर पतंग या गंधामुळे मिलनासाठी मादीकडे आकर्षिले जातात. कापसावरील बोंडअळ्यांचे मादी पतंग हा विशिष्ठ प्रकारचा गंध आपल्या शरीराद्वारे सोडतात आणि नर पतंग या मादीकडे आकर्षिले जातात. त्याच प्रकारचा कृत्रिमरित्या गंध वापरून नर पतंगांना आकर्षून सापळ्यात पकडले जाते. कृत्रिमरित्या हा गंध तयार करून गोळ्याच्या स्वरुपात वापरल्या जातो. या गोळ्यांना ल्यूर अथवा सेप्टा म्हणतात. या गोळ्याचा वापर एक प्रकारच्या प्लास्टिकच्या सापळ्यात करतात त्याला कामगंध सापळे म्हणतात.

या गोळ्यावरील कामगंध हवेत संप्लवन होवून मिसळतो. यामुळे ठराविक प्रकारचे नर पतंग ल्यूरच्या दिशेने आकर्षिले जातात आणि सापळ्यात पकडले जातात. कामगंध हे विशिष्ठ प्रजातीसाठी विशिष्ठ प्रकारचे असतात म्हणून प्रत्येक बोंडअळीसाठी वेगळ्या प्रकारचा कामगंध असतो. जगातील कीटकांच्या जवळपास १०० च्यावर विविध प्रजातीमधील कामगंधाच्या माहितीची नोंद करण्यात आली आहे. त्यात भारतातील पिकावर आढळणाऱ्या २० आणि साठविलेल्या धान्यावर येणाऱ्या ७ प्रजातीचा समावेश आहे.

कापसावरील बोंडअळ्यांच्या पतंगासाठी लागणारे विशिष्ट कामगंध ल्यूर्स हे खालीलप्रमाणे

पतंगकामगंध ल्यूर
अमेरीकन बोंडअळीहेली ल्यूर
ठिपकेदार बोंडअळीइरव्हीट ल्यूर
शेंदरी बोंडअळीपेक्टीनो ल्यूर

याशिवाय बऱ्याचदा तंबाखूवरील अळीसाठी स्पोडोल्यूर तर पाने गुंडाळणाऱ्या अळीसाठी ईरिन ल्यूरचा वापर केल्या जातो.

कामगंध सापळा

यामध्ये नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी सापळ्याला वरती एक छप्पर असते तेथे ल्यूर बसविण्यासाठी जागा असते. छाप्पराच्या खाली पतंग पकडण्याची पिशवी उभी धरून ठेवण्यासाठी एक कडे असते. कामगंध ल्यूरचे संयुगे वातावरणात ताबडतोब उडून जाऊन नष्ट होतात. तरीही त्यांचा परिणाम साधारणपणे एक महिनाभर टिकतो.

सापळ्यांचा वापर

  • सापळ्याला आधार देणारी काठी कड्याला बांधावी. पिशवीचा खालचा भाग बंद करून काठाला बांधावा. मातीमध्ये काठी घट्ट बसवावी. पिकामध्ये सापळा बसवितांना सापळ्याचे छप्पर पिकाच्या उंची पेक्षा १ ते २ फुट उंच असावे अशी काळजी घ्यावी.
  • मोठ्या प्रमाणावर किडी पकडण्यासाठी हेक्टरी १० सापळे किडी निहाय बसवावेत. तर किडींच्या आगमनाचे संकेत मिळण्यासाठी २ हेक्टर क्षेत्रास एक सापळा पुरेसा होतो. सापळ्याच्या पिशवीत अडकलेले पतंग ठराविक कालमर्यादेत काढून पिशव्या रिकाम्या करणे अत्यंत गरजेचे आहे.
  • किडीचे प्रमाण ज्यावेळी कमी असते अशा वेळी मोठ्या प्रमाणात कीड पकडण्यासाठी सापळ्याचा वापर उपयुक्त ठरतो. किडीचे प्रमाण जास्त आढळून आल्यास किटकनाशकाचा वापर करून ते खाली आणावे आणि नंतर कामगंध सापळे वापरावीत. या दोन्ही तंत्राचा समतोल वापर कीड व्यवस्थापनात अधिक फायदेशीर आहे.

फायदे 

१) किडीच्या आगमनाचे संकेत ताबडतोब मिळतात त्यामुळे व्यवस्थापनाची दिशा निश्चित करण्यास मदत होते व योग्य वेळी किटकनाशकाची फवारणी करता येते.
२) किडींची आर्थिक नुकसानीची पातळी निश्चित करता येते. उदा. अमेरिकन बोंडअळीचे  ८ ते ९ पतंग प्रती सापळा सतत ५ ते ६ दिवस आढळणे.
३) कीड नियंत्रणासाठी वापर केल्यास रासायनिक किटकनाशके आणि मजुरीचा खर्च कमी होतो.
४) किडींची संख्या कमी असतांनाच सापळे वापरायचे असल्यामुळे पिकाचे सांभाव्य नुकसान टाळता येते.
५)सापळे बिनविषारी असल्यामुळे वातावरणाचे प्रदूषण होत नाही.
६) किटकनाशकाचा वापर व त्यापासून होणारे धोके कमी केल्या जातात.
७) परोपजीवी किडी सुरक्षित राहतात.
८) सापळ्यांचा वापर अत्यंत सुलभ व सोपा आल्यामुळे शेतकरी सहज वापर कार्य शकतात.
९) एकत्मिक कीड व्यवस्थापनात महत्वाचा घटक म्हणून कामगंध सापळे वापरता येतात.

कापूस संशोधन केंद्र, नांदेड
वंसतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

 

Web Title: Pheromone trap low cost solution for cotton pests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.