Lokmat Agro >शेतशिवार > Pik Karja : बिनव्याजी पीक कर्ज मर्यादेत वाढ; 'इतक्या' लाखापर्यंत मिळणार

Pik Karja : बिनव्याजी पीक कर्ज मर्यादेत वाढ; 'इतक्या' लाखापर्यंत मिळणार

Pik Karja : Increase in interest-free crop loan limit; 'So much' will get up to lakhs | Pik Karja : बिनव्याजी पीक कर्ज मर्यादेत वाढ; 'इतक्या' लाखापर्यंत मिळणार

Pik Karja : बिनव्याजी पीक कर्ज मर्यादेत वाढ; 'इतक्या' लाखापर्यंत मिळणार

Pik Karja : शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी विविध बँकांच्या वतीने बिनव्याजी पीक कर्ज (Pik Karja) देण्यात येते. या पीककर्जाच्या मर्यादेत आता वाढ करण्यात आली. त्यासंदर्भातील सविस्तर माहिती वाचा.

Pik Karja : शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी विविध बँकांच्या वतीने बिनव्याजी पीक कर्ज (Pik Karja) देण्यात येते. या पीककर्जाच्या मर्यादेत आता वाढ करण्यात आली. त्यासंदर्भातील सविस्तर माहिती वाचा.

शेअर :

Join us
Join usNext

विवेक चांदूरकर

शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी विविध बँकांच्या वतीने बिनव्याजी पीक कर्ज (Pik Karja) देण्यात येते. या पीककर्जाच्या मर्यादेत आता वाढ करण्यात आली असून, शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत पीककर्ज (Pik Karja) देण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्यातील १ लाख ६० हजारांपेक्षा जास्त शेतकरी खरीप हंगामात पीककर्ज (Pik Karja)घेतात. शेतकऱ्यांना एक वर्षासाठी बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येते. यावर्षी १ एप्रिल २०२५ पासून यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

आतापर्यंत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत होते. पीककर्जाच्या रकमेत वाढ करण्यात आली असली, तरी सोयाबीन, कपाशी व तूर या मुख्य पिकांच्या कर्जाच्या रकमेत मात्र वाढ करण्यात आली नाही.

सोयाबीन पिकासाठी ६०,९०० रुपये प्रति हेक्टरी पीककर्ज (Pik Karja) देण्यात येते. कपाशीसाठी ७३,५००, तर तुरीसाठी ५०,८२० रुपये पीककर्ज देण्यात येते. मूग व उडिदाच्या पीककर्जाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून, पूर्वी मूग व उडीद पिकासाठी २२,८०० रुपये कर्ज देण्यात येत होते. आता २३,९४० रुपये पीककर्ज देण्यात येणार आहे.

आता दोन लाख कर्ज हवे असल्यास लागणार सर्च रिपोर्ट

१. शेतकऱ्यांना आतापर्यंत १ लाख ६० हजार रुपये पीक कर्ज हवे असल्यास सर्च रिपोर्ट काढावा लागत होता. यामध्ये आता वाढ करण्यात आली असून, २ लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज असल्यास सर्च रिपोर्ट काढावा लागणार आहे.

२. सर्च रिपोर्ट बँकेने ठरविलेल्या वकिलांकडून काढावा लागतो. त्याकरिता तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. आता रक्कम वाढविल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

८७% उद्दिष्ट गतवर्षी पूर्ण

मागील वर्षी अकोला जिल्ह्याला खरीप हंगामात पीककर्ज वाटपाकरिता १३०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ११५२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ही टक्केवारी ८७ टक्के आहे.

बँकांना आदेश नाहीत

महाराष्ट्र शासनाच्या वतीने पीककर्ज वाढीचा निर्णय घेण्यात आला असला, तरी अद्याप बँकांना याबाबत आदेश देण्यात आले नाहीत. १ एप्रिलपासून २०२५-२६ या वर्षासाठी पीककर्ज वाटपास सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी आदेश येण्याची शक्यता असल्याचे अकोला लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी सांगितले

मर्यादावाढीचा फायदा मोठ्या शेतकऱ्यांनाच

शासनाने शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या मर्यादेत वाढ केली असली, तरी सोयाबीन, कपाशी, तूर या जिल्ह्यातील मुख्य पिकाच्या पीककर्जाच्या रकमेत वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे पाच एकरांपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही. या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकरी जेवढे कर्ज मिळत होते, तेवढेच मिळणार आहे.

पीकनिहाय मिळणारे पीककर्ज

पीक

पीककर्ज २०२४(प्रती हेक्टर)पीककर्ज २०२५ (प्रती हेक्टर)
सोयाबीन६०,९०० रुपये६०,९०० रुपये
कपाशी७३,५०० रुपये७३,५०० रुपये
तूर५०,८२० रुपये५०,८२० रुपये
मूग२२,८०० रुपये२३,९४० रुपये
उडीद२२,८०० रुपये२३,९०० रुपये

हे ही वाचा सविस्तर : Shetmal Hamibhav: सोयाबीन, तूर एमएसपीच्या आत, कायद्याची अंमलबजावणी केव्हा? वाचा सविस्तर

Web Title: Pik Karja : Increase in interest-free crop loan limit; 'So much' will get up to lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.