Lokmat Agro >शेतशिवार > Pik Vima: राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल

Pik Vima: राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल

Pik Vima: 1 crore 65 lakh 70 thousand 437 crop insurance applications filed in the state | Pik Vima: राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल

Pik Vima: राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल

Crop Insurance: खरीप हंगाम २०२४ साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार ३१ जुलै रोजी संपुष्टात आली असून ३१ जुलै अखेर राज्यातुन १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज पीकविमा पोर्टलवर दाखल झाले.

Crop Insurance: खरीप हंगाम २०२४ साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार ३१ जुलै रोजी संपुष्टात आली असून ३१ जुलै अखेर राज्यातुन १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज पीकविमा पोर्टलवर दाखल झाले.

शेअर :

Join us
Join usNext

खरीप हंगाम २०२४ साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार ३१ जुलै रोजी संपुष्टात आली असून ३१ जुलै अखेर राज्यातुन १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज पीकविमा पोर्टलवर दाखल झाले असून याव्दारे लाखो शेतकऱ्यांनी आपले पीक केवळ १ रुपया विमा हफ्ता भरून आपले पीक विमा संरक्षित केले असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पीकविमा पोर्टलच्या वतीने सुरुवातीला १५ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे बरेच शेतकरी तेव्हा विमा भरण्यापासून वंचित राहिल्याने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विनंती करून ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ करून घेतली होती. १५ जुलै नंतर अखेरपर्यंत २१ लाख ९० हजार अर्जांची त्यामुळे वाढ झाली आहे.

दरम्यान राज्यात एकूण ९७% पेरणी पूर्ण झाली असून पीकविमा योजनेच्या माध्यमातून एकूण १ कोटी १० लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. तर एकूण विमा संरक्षित रक्कम ही ५३ हजार ८८६ कोटी इतकी आहे. 

एकूण विमा हफ्ता हा सुमारे ७९५९ कोटी इतका निश्चित असून, त्यापैकी शेतकरी हिस्सा एक रुपया प्रमाणे १ कोटी ६५ लाख, राज्य हिस्सा एकूण ४७२५ कोटी, त्यामध्ये राज्य शासनाचा स्वतःचा हिस्सा ३२३२ कोटी व शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासनाने भरावयाचा हिस्सा १४९२ कोटी इतका निश्चित करण्यात आला असून केंद्र सरकारचा हिस्सा ३२३३ कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे.

दरम्यान मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये सुमारे १ कोटी ७१ लाख विमा अर्ज दाखल झाले होते तर संपूर्ण हंगामात वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विम्या पोटी आतापर्यंत ७२८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

त्यापैकी ४२७१ कोटी पिक विम्याचे वाटप पूर्ण झाले असून आणखी ३००९ कोटी रुपयांचे वितरण सध्या सुरू असून अंतिम पीक कापणी अहवालाचे काम १००% पूर्ण झाल्यानंतर या रकमेत आणखी वाढ होणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Web Title: Pik Vima: 1 crore 65 lakh 70 thousand 437 crop insurance applications filed in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.