Lokmat Agro >शेतशिवार > Pik Vima Claim : पीक विमा का काढावा व कसा करावा क्लेम वाचा सविस्तर

Pik Vima Claim : पीक विमा का काढावा व कसा करावा क्लेम वाचा सविस्तर

Pik Vima Claim : Why take out crop insurance and how to claim, read in detail | Pik Vima Claim : पीक विमा का काढावा व कसा करावा क्लेम वाचा सविस्तर

Pik Vima Claim : पीक विमा का काढावा व कसा करावा क्लेम वाचा सविस्तर

पीकविमा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असून, यात पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि इतर संकटांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळते.

पीकविमा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असून, यात पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि इतर संकटांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळते.

शेअर :

Join us
Join usNext

पीकविमा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असून, यात पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि इतर संकटांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळते.

जेव्हा पिकांचे नुकसान होते, तेव्हा विमा कंपनी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या किमतीची भरपाई देते.

पीकविमा का आवश्यक?
१) सामाजिक सुरक्षा

ही योजना शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना सामाजिक सुरक्षा प्रदान करते. यामुळे संकटाच्या वेळी त्यांना सुरक्षित वाटते.
२) संकटावेळी मदत
शेती हा जोखमीचा व्यवसाय आहे. पीकविमा शेतकयांना विविध जोखमींपासून संरक्षण देतो.
३) गुंतवणूक
विमा संरक्षण मिळाल्याने शेतकरी नवीन तंत्रज्ञान आणि नव्या पिकांकडे वळतो. त्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होते.
४) नुकसानभरपाई
पीकविमा उत्पादनाच्या नुकसानाची भरपाई करण्यास मदत करतो.
५) सरकारी मदत
देशांत पीकविमा अनुदानित आहे. त्यामुळे आर्थिक बोजा कमी होतो.
६) दीर्घकालीन गुंतवणूक
विमा संरक्षण मिळाल्याने शेतकऱ्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळते.

कसा कराल क्लेम?
■ पीकविमा दावा मिळविण्यासाठी पॉलिसी कमांक, विमा कंपनीचे नाव आणि कव्हर केलेल्या पिकाचा तपशील यांसारखी सर्व पॉलिसी माहिती एकत्र करा.
■ यानंतर विमा कंपनीचे स्थानिक कार्यालय किवा ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि तुमच्या पिकाच्या परिस्थितीबाबत सांगा.
शेतीच्या स्थितीचा फोटो, पीक काढणीचा पुरावा, संबंधित कागदपत्रे जमा करा.
■ दाव्याची स्थिती जाणून घेण्यासाठी विमा कंपनीशी नियमित संपर्कात राहा. यानंतर सर्वेक्षण करून विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

महत्त्वाच्या टिप्स
■ सर्व कागदपत्रांच्या प्रती नेहमी जवळ ठेवा.
■ वेळेच्या मर्यादेकडे लक्ष द्या; कारण दावा करण्यासाठी वेळ कमी असतो.
■ कोणतीही समस्या किवा विलंब झाल्यास, विमा कंपनीशी त्वरित संपर्क साधा.

चंद्रकांत दडस
उपसंपादक

Web Title: Pik Vima Claim : Why take out crop insurance and how to claim, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.