Lokmat Agro >शेतशिवार > Pikvima मागच्या वर्षीच्या पीक विम्याचे पैसे आता आले शेतकऱ्यांच्या खात्यावर

Pikvima मागच्या वर्षीच्या पीक विम्याचे पैसे आता आले शेतकऱ्यांच्या खात्यावर

Pikvima: Last year's crop insurance money has now arrived in farmers account | Pikvima मागच्या वर्षीच्या पीक विम्याचे पैसे आता आले शेतकऱ्यांच्या खात्यावर

Pikvima मागच्या वर्षीच्या पीक विम्याचे पैसे आता आले शेतकऱ्यांच्या खात्यावर

गत हंगामात परिसरामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शिवाय पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी पेरणी होऊनही उत्पादन निघाले नाही. त्यामुळे शासनाने एक रुपयांमध्ये पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्या दोन दिवसांपासून विमा रक्कम जमा होऊ लागली आहे.

गत हंगामात परिसरामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शिवाय पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी पेरणी होऊनही उत्पादन निघाले नाही. त्यामुळे शासनाने एक रुपयांमध्ये पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्या दोन दिवसांपासून विमा रक्कम जमा होऊ लागली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मायणी: गत हंगामात परिसरामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शिवाय पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी पेरणी होऊनही उत्पादन निघाले नाही. त्यामुळे शासनाने एक रुपयांमध्ये पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्या दोन दिवसांपासून विमा रक्कम जमा होऊ लागली आहे.

ऐन पेरणी हंगामात विमा रक्कम आल्याने शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. शासनाने गतवर्षी एक रुपयात विमा शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचा सर्वत्र प्रचार करून शेतकऱ्यांना विमा घेण्यासाठी प्रवृत्त केले.

सुरुवातीला अनेक अडचणी ऑनलाइन फॉर्म भरताना येत होत्या. मात्र, महा-ई-सेवा केंद्रधारकांनी रात्रीचा दिवस करून अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवला.  गतवर्षी मायणी भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शिवाय अनेक भागात पावसाने ओढ दिली.

त्यामुळे पेरणी होऊनही म्हणावे असे उत्पादन निघाले नाही. काही ठिकाणी पेरण्या होऊनही उगवलेच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पेरणी व मशागतीचा खर्च वाया गेला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा डोळा पीकविम्याकडे लागला होता. पीक विम्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

अखेर दोन दिवसांपासून मायणी परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकांच्या प्रतवारीप्रमाणे पीक विमा रक्कम जमा होऊ लागली आहे. ऐन पेरणीच्या हंगामात ही पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर येत असल्याने शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पेरणी खोळंबली
गतवर्षीप्रमाणे याही वर्षी एक रुपयात पीक विमा योजना लागू आहे. मात्र, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस, तर काही ठिकाणी अजून पाऊस झाला नसल्याने अशा दोन्ही ठिकाण पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शासनाने यावर्षी पीक विमा उतरवण्याची मुदत वाढवून देणे गरजेचे आहे.

यंदा मुदतवाढ देण्याची गरज
• गतवर्षी जून, जुलै महिन्यामध्ये एक रुपयामध्ये पीक विमा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत होती.
• ऑनलाइन अर्ज भरताना मोठा अडथळा येत असतानाही महा-ई-सेवा केंद्र चालकांनी रात्रीचा दिवस करून अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा काढला, याचा फायदा आज शेतकरीवर्गाला होताना दिसत आहे.

अधिक वाचा: Pikvima: शेतकरी बांधवांनो, १०० रुपये वाचवा, घरीच भरा पीक विमा, कॉम्प्युटरवाल्याला कशाला जास्तीचे पैसे देता?

Web Title: Pikvima: Last year's crop insurance money has now arrived in farmers account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.