Lokmat Agro >शेतशिवार > Pikvima Update आधार कार्ड व सातबारा उतारा यावरील नावात थोडासा बदल असेल तरी पिक विमा अर्ज स्वीकारणार

Pikvima Update आधार कार्ड व सातबारा उतारा यावरील नावात थोडासा बदल असेल तरी पिक विमा अर्ज स्वीकारणार

Pikvima Update: Even if there is a slight change in the name on the Aadhaar Card and Satbara, Crop Insurance will accept the application | Pikvima Update आधार कार्ड व सातबारा उतारा यावरील नावात थोडासा बदल असेल तरी पिक विमा अर्ज स्वीकारणार

Pikvima Update आधार कार्ड व सातबारा उतारा यावरील नावात थोडासा बदल असेल तरी पिक विमा अर्ज स्वीकारणार

पिक विमा भरताना आधार कार्ड व सातबारा उतारा यावरील नावात थोडासा बदल असेल तरी विमा अर्ज स्वीकृत होतील.

पिक विमा भरताना आधार कार्ड व सातबारा उतारा यावरील नावात थोडासा बदल असेल तरी विमा अर्ज स्वीकृत होतील.

शेअर :

Join us
Join usNext

यावर्षीपासुन पिकविमा योजनेत भाग घेणेसाठी आधार कार्ड, बँक खाते व ७/१२ यावर नाव एकसारखे असणे आवश्यक आहे. यात किरकोळ जरी बदल असेल तरी विमा योजनेत सहभागी होता येणार नाही, अशा आशयाचा मेसेज व्हॉट्सॲप द्वारे फिरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की, आधार कार्ड व बँक खात्यात बहुतेक नावे सारखी असतात. परंतु ७/१२ वर कधी कधी नावात  किरकोळ बदल असतो. असे असले तरी विमा अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

नावात थोडासा बदल असल्यास हरकत नाही परंतू पूर्णनाव, आडनाव वेगळे असल्यास चालणार नाही. नावात असलेला बदल विमा कंपनी मार्फत तपासला जाईल आणि तपासणी अंती अर्ज स्वीकृतीबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून जावू नये.

मात्र शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाचा आणि लागवड असलेल्या क्षेत्राचाच विमा घ्यावा. विमा घेतलेले पीक प्रत्यक्षात शेतात आढळले नाही तर विमा अर्ज नामंजूर होईल. शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी शक्यतो ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करावी. दिनांक २ जुलै २०२४ पर्यंत सुमारे ५७ लाख विमा अर्ज प्राप्त झाले आहेत.

खरीप हंगामात विमा घेण्यासाठीचा अंतिम दिनांक १५ जुलै २०२४ आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा तातडीने उतरवून घ्यावा. असे आवाहन कृषी विभाग मार्फत करण्यात येत आहे.

सामायिक सुविधा केंद्र (CSC) च्या माध्यमातून विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे शुल्क देणे अपेक्षित आहे. यासाठी शेतकऱ्याने स्वतःचा सातबारा आठ अद्यावत उतारा व इतर कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे अपेक्षित आहे.

याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्काची मागणी सामायिक सुविधा केंद्र चालकाने केल्यास याबाबत तक्रार खालील टोल फ्री क्रमांक वर करण्यात यावी. याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल. 

सीएससी गव्हर्नर सर्विसेस इंडिया लिमिटेड
टोल फ्री क्रमांक : १४५९९/१४४४७ 
व्हाॅटसअप क्रमांक : ९०८२६९८१४२ 
तक्रार नोंद क्रमांक : ०११- ४९७५४९२३ /४९७५४९२४ 

Web Title: Pikvima Update: Even if there is a slight change in the name on the Aadhaar Card and Satbara, Crop Insurance will accept the application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.