पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता खात्यावर येण्याची अनेकजण वाट पाहत आहेत. मात्र त्यासाठी अजूनही बरेच शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हप्ता हवा असेल, तर आता केवायसीसाठी शेवटचा दिवस बाकी आहे. म्हणजेच केवायसीसाठी शेवटची मुदत ३१ जानेवारी २४ अशी आहे.
या तारखेपर्यंत पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे ई-केवायसी वेळेवर केल्याचे सुनिश्चित करावे जेणेकरून त्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ता मागच्या वर्षी १५ नोव्हेंबर २३ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.आता शेतकरी पीएम किसान योजनेच्या १६व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र हप्ता फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळेल ज्यांनी त्यांचे ई-केवायसी पूर्ण केले आहे.
शेतकऱ्यांना पुढील पद्धतीने केवायसी करता येईल
शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. पीएम किसान मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी करू शकतात. पीएम किसान मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. आधार केंद्र चालक किंवा जवळच्या संगणक केंद्र चालकांकडून बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे शेतकरी ई-केवायसी करू शकतात. तसेच pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट देऊन शेतकरी OTP द्वारे ई-केवायसी देखील करू शकतात.
ई-केवायसी कशी करावी ?
तर पहिल्यांदा पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर मुख्यपृष्ठावरील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा. त्यात तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका. सबमिट पर्यायावर क्लिक करा. अशा पद्धतीने तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.