PM Kisan Samman 18th Instalment : पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता दिनांक १८ जून रोजी देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता. यावेळी एकूण ९.२६ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण २० हजार कोटी रुपये जमा झालेत. आता शेतकऱ्यांना पीएम किसानच्या (PM Kisan Yojana) पुढच्या म्हणजेच १८व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
अनेक शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेचा १८वा हप्ता खात्यात कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी लवकरच दिलासादायक बातमी मिळू शकते. पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये प्रत्येकी दोन हजार या प्रमाणे मिळतात. साधारणत: दर ४ महिन्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळत असतो.
जून महिन्यात जमा झालेल्या दोन हजार रुपयांच्या हप्त्यानंतर आता सुमारे ४ महिन्यांनी म्हणजेच साधारणत: ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान योजनेचा १८वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. मात्र यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
असे समजते हप्त्याबद्दलअजूनही अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. ज्यांनी केवासी केलेली नाही, त्यांनी तातडीने करून घेतली, तर त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्यात काही अडचण येणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत, त्यांना त्याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून मिळते. अनेक शेतकरी असेही असतात की कागदपत्रे आणि केवायसी केल्यानंतरही त्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. तुम्हीही त्यापैकी एक असाल, तर जाणून घेऊ या बद्दल तक्रार कशी करायची? ते.
ऑनलाईन माध्यमातून तक्रारपीएम किसानचा हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्ही तक्रार ऑनलाइन नोंदवू शकतात. त्यासाठी pmkisan-ict@gov.in वर मेल करता येईल.
फोनद्वारे करा तक्रारयाशिवाय शेतकरी हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा टोल फ्री क्रमांक- 1800115526 वर तुम्हाला फोन करून संपर्क करता येईल. तसेच ०११-२३३८१०९२ या क्रमांकावरही तुम्ही संपर्क करू शकता.
तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे कसे तपासावे? पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला pmkisan.gov.in भेट द्या.मुख्यपृष्ठावर लाभार्थी स्थिती या टॅबवर क्लिक करायामध्ये आधार क्रमांक, खाते क्रमांक व मोबाइल नंबर टाकावा लागेल.निवडलेल्या पर्यायावर डेटा मिळवा या टॅबवर क्लिक करालाभार्थी डेटा पाहण्यास पात्र ठरतील.