Join us

PM Kisan : शेतकऱ्यांनी मोबाइल बदलले अन् पीएम किसानचे पैसे अडकले वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 9:59 AM

PM Kisan Sanman Nidhi पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे अद्यापही ई-केवायसी झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३ हजार २५६ शेतकरी आगामी पीएम किसानच्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे.

सांगली : पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे अद्यापही ई-केवायसी झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३ हजार २५६ शेतकरी आगामी पीएम किसानच्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी करून घेण्याची गरज आहे. काही शेतकऱ्यांनी मोबाइल नंबर बदलल्यामुळेही ई- केवायसी होण्यात अडचणी आहेत.

जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत ४ लाख ११ हजार ६५४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी तब्बल १८ हजार ४०५ शेतकऱ्यांनी मोबाइल नंबर बँक खात्याशी जोडले नाही. तसेच ३ हजार २५६ शेतकऱ्यांनी मोबाइल नंबरच बदलले आहेत.

यामुळे या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही. या शेतकऱ्यांनी मोबाइल नंबर आणि ई- केवायसी पूर्ण न केल्यास पीएम किसान आणि नमो सन्मान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

३२५६ शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकीजिल्ह्यातील पीएम किसान योजनेसाठी ४ लाख ११ हजार शेतकरी पात्र आहेत. यापैकी ४ लाख ८ हजार ३९६ शेतकऱ्यांनी ई- केवायसी पूर्ण केली आहे. उर्वरित ३ हजार २५६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही.

१८,४०५ शेतकऱ्यांनी बँक खात्याला आधार जोडले नाहीजिल्ह्यातील १८ हजार ४०५ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. पण, बँक खात्याला आधार जोडले नसल्यामुळे हेही शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

साडेअठरा हजार शेतकऱ्यांचे लटकले पीएम किसान, नमो सन्मानचे पैसेजिल्ह्यातील १८ हजार ५०० शेतकऱ्यांनी बँक खाते आधारला जोडले नाही. तसेच ई-केवायसी पूर्ण केली नाही. म्हणून हे शेतकरी पीएम किसान, नमो सन्मान योजनेच्या पैशापासून वंचित राहिले आहेत.

पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांनी मोबाइल नंबर, आधार नंबर बँक खात्याला जोडणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तरही त्यांनी तातडीने करून घेण्याची गरज आहे. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, सांगली

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनासरकारराज्य सरकारआधार कार्डशेतकरीबँकसांगलीसरकारी योजना