Join us

PM Kisan Fraud Message : सावधान! पीएम किसानची फाईल डाऊनलोड केली अन् शेतकऱ्याला लागला २.४७ लाखांचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 8:55 PM

PM Kisan Fraud Message : काही वेळातच चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर ताबा मिळवून त्यांच्या खात्यातील २ लाख ४८ हजार १५६ रूपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळवले. पण त्यांना ही गोष्ट उशिरा लक्षात आली आणि त्यांनी १६ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

Pune : पीएम किसानच्या यादीचे फेक मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे. पीएम किसान डॉट एपीके ही फेक फाईल डाऊनलोड करताच अमरावती येथील ३६ वर्षीय युवकाच्या कात्यातून २ लाख ४८ हजार १५६ रूपये डेबीट झाले आहेत. २२ ते १८ सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहितीनुसार, आविनाश रोतळे असे या व्यक्तीचे नाव असून त्यांना व्हॉट्सअपवर pmkisan.apk नावाची फाईल प्राप्त झाली. ती फाईल महत्त्वाची वाटल्याने त्यांनी ती फाईल ओपन करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली. काही वेळातच चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर ताबा मिळवून त्यांच्या खात्यातील २ लाख ४८ हजार १५६ रूपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळवले. पण त्यांना ही गोष्ट उशिरा लक्षात आली आणि त्यांनी १६ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून pmkisan.apk नावाची फाईल वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर पाठवली जात आहे. प्रामुख्याने ज्या व्हाट्सअॅप ग्रुवर शेतकरी आहेत अशा ग्रुपवर ही फाईल पाठवली जाते आणि 'या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करा' असे सांगितले जाते. अनेक शेतकरी ही फाईल डाऊनलोड करून फसल्याच्या घटना घडल्या आहेत. 

त्याबरोबरच ऑनलाईन चोरट्यांनी चोरी करण्यासाठीच्या नवनव्या युक्त्या शोधून काढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी अशा अज्ञात लिंक, मेसेज यांपासून दूर राहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमहाराष्ट्रप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना