प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया सतत सुरू असली तरी अद्याप शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता व राज्य शासनाच्या नमो महासन्मान योजनेचा चौथा हप्ता जून अखेरीस किंवा जुलै महिन्यात मिळणार आहे. दोन्ही हप्त्यांच्या एकूण चार हजार रुपयांसाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे क्रमप्राप्त आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षभरात सहा हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य शासनाकडूनही 'नमो महासन्मान' योजना सुरू करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकत्रित १२ हजार रुपये मिळू लागले आहेत.
यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. या योजनेचा लाभ खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी योजनेत समाविष्ट असलेल्या ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांना अॅन्ड्राइड मोबाइलवरून ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच आगामी हप्ता मिळणार आहे.
कृषी विभागाकडून जनजागृतीई-केवायसर्सी आणि आधार सीडिंग न केलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी कृषी विभागाकडून यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार तलाठी, कृषी सहायक यांच्यामार्फत संबंधितांना कळविण्यात आले. शिवाय, जनजागृतीही करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी आणि आधार सीडिंग पूर्ण केले नसेल, त्यांनी ही प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन कृषी अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
तर दोन्ही हप्त्यांचे मिळून चार हजार रुपये मिळणार नाहीतआगामी हप्त्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करा. पीएम किसान योजनेचा १८ वा आणि नमो महासन्मान योजनेचा चौथा हप्ता जून किवा जुलै महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. तत्पूर्वी केवायसी करण्याची शेतकऱ्यांना संधी आहे. आगामी हप्त्यापूर्वी केवायसी पूर्ण केल्यास अशा शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्यांचे मिळून चार हजार रुपये मिळणार नाहीत.
अधिक वाचा: राज्यात शेतकऱ्यांचा पहिला ऊस वजनकाटा; ऊस वजनचोरीवर अंकुश