PM Kisan Scheme :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Scheme) व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या ४११ मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक तालुक्यानुसार ३५५ नोडल अधिकाऱ्यांची नेमणूकही (Nodal Officer) केली जाणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो. तथापि, किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे स्वयंनोंदणीकृत लाभार्थीना मान्यता प्रदान करणे, पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई-केवायसी प्रमाणिकरण, बँक खाती आधार संलग्न करणे, चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे, मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे याबाबी प्रलंबित असल्याने, केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे.
सदर दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता, तसेच, क्षेत्रिय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेले पदे विचारात घेता, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या ४११ मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणद्वारे उपलब्ध करुन घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित शासन निर्णय पाहण्यासाठीही लिंकवर क्लिक करा.