पीएम किसान सन्मान योजनेतून तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत, असा एसएमएस अनेकांना आलाय. संबंधित शेतकरी जेव्हा बँक बॅलेन्स चेक केला असता त्यांना धक्काच बसला. त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झालेच नव्हते.
याबाबत कृषी विभागाला विचारले असता संबंधित शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेला पात्र असून त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये वर्ग केले आहेत. पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच पैसे जमा होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून तीन हप्त्यात सहा हजार रुपये जमा होत आहेत. जवळपास पाच लाखांहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले.
अॅपचा वापर करावा- या मोहिमेदरम्यान केवळ ई-केवायसी प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजीकचे सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे.- शेतकऱ्यांनी स्वतःचे ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाइलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन अॅप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पीएम किसान योजनेंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरण, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाते आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः हजर असणे आवश्यक आहे. बँक खाती आधार संलग्न करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी प्राधान्याने नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे.
सदर बाबींची पूर्तता केलेल्यांनाच केंद्र शासनाकडून पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता मिळाला. पीएम किमान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थीनाच राज्याच्या नमो शेतकरी महासत्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारकडून देखील दरवर्षी सहा हजार रुपये मिळणार आहेत.