Join us

पीएम किसानचा 15 वा हफ्ता मिळाला नाही, या नंबरवर फोन करा...

By गोकुळ पवार | Published: November 22, 2023 2:57 PM

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता नुकताच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे

 PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा (PM Kisan) 15 वा हप्ता नुकताच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.  मात्र अजूनही अनेक शेतकरी 15 वा हफ्ता मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. यासाठी थेट पीएम किसानच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून हफ्ता अडकला का आहे, याच उत्तर शेतकऱ्यांना मिळू शकतं. नेमकी याची प्रोसेस कशी आहे, हे जाणून घेऊयात.

देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना (PM Kisan Yojna) राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. आतापर्यंत या योजनेचे 14 हफ्ते लाखो शेतकऱ्यांना मिळाले असून नुकताच 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र काही शेतकरी अजूनही 15 व्या हफ्त्यापासून (PM Kisan 15th Installment) वंचित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे असे शेतकरी पीएम किसान चा हफ्ता कधी 5आणि कसा मिळेल या प्रश्नात अडकले आहेत. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून हेल्पलाईन नंबर सेवा सुरू आहे. या नंबरच्या माध्यमातून नेमका हफ्ता कुठे अडकला, याबाबत सांगोपांग माहिती घरबसल्या मिळू शकते. 

दरम्यान आज लाखो शेतकरी पीएम किसानच्या माध्यमातून लाभ घेत आहेत. या योजनेच्या संदर्भात काही अडचणी आल्यास थेट हेल्पलाईन क्रमांकावर (Helpline Number) संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सद्यस्थितीत अनेक शेतकऱ्यांचा 15 वा हफ्ता मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी ही सुविधा फायदेशीर आहे. काही कारणास्तव तुमचा हप्ता आला नसेल, तर तुम्ही योजनेच्या 155261 हेल्पलाइन नंबरवर कॉल करून योग्य मदत मिळवू शकता. त्याचबरोबर 1800115526 या नंबरवर देखील संपर्क करू शकता.तुमचा हप्ता का आला नाही, तो कशामुळे अडकला आहे, इत्यादी इतर माहिती तुम्ही या नंबरवरून मिळवू शकता. याशिवाय 011-23381092 या क्रमांकावर कॉल करूनही तुम्ही तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता, अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांचा 15 वा हफ्ता अडकला आहे, अशा शेतकऱ्यांनी थेट हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. 

 

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनासरकारी योजनाशेतीशेतकरी