Join us

P.M. Kisan Yojana : चिंता नको : 'पी.एम.' पोर्टलवर चुकीचा क्रमांक नमूद केला; आता करता येणार दुरुस्ती! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 6:42 PM

पी.एम. किसान योजनेसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थीनी या अगोदर नोंदणी करताना आपला मोबाइल क्रमांक अद्यावत करता येणार आहे. (P.M. Kisan Yojana)

 

 

पी.एम. किसान योजनेसाठी पोर्टलवर (संकेतस्थळ) नजरचुकीने चुकीचा मोबाइल क्रमांक नमूद करण्यात आला असेल तर आता चिंता करू नका.  शेतकरी लाभार्थीसाठी कृषी विभागाची सुखद वार्ता आहे. या लाभार्थीना ३१ ऑगस्टपर्यंत संकेतस्थळावर चुकीच्या मोबाइल क्रमांकाची दुरुस्ती करता येणार आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील १ हजार ३२१ शेतकऱ्यांना मोबाइल क्रमांक बदलावा लागणार आहे. पी.एम. किसान योजनेसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थीनी या अगोदर नोंदणी करताना आपला मोबाइल क्रमांक अनेक नोंदणीसाठी वापरण्यात आलेला आहे. 

तसेच पोर्टलवर डाटा अपलोड करताना चुकीचे मोबाइल क्रमांकदेखील लाभार्थीनी नोंदणी केल्याचे निदर्शनास आले आहे. चुकीचा मोबाइल क्रमांक नोंदणी केल्याने शेतकरी पी.एम. किसानच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 

अशा लाभार्थीना केंद्र शासनाने पी.एम. किसान पोर्टलवरील लाभार्थीचे डुप्लिकेट असलेले मोबाइल क्रमांक दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील चार हजार ६४८ शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही. तसेच ४ हजार ४२९ शेतकऱ्यांनी बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न केलेला नाही. त्यामुळे, या शेतकऱ्यांना पिएम किसान आणि राज्य शासनाच्या नमो सन्मान योजनेचा अनुदानापासून वंचित रहावे लागणार आहे. 

त्यामुळे, या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी तसेच बँक खात्याला आधार क्रमांक जोडावा किवां पोस्ट बँकमध्ये खाते काढावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

तालुका कृषी अधिकाऱ्यांशी साधा संपर्क

■ ज्या शेतकऱ्यांनी पी.एम. किसानच्या पोर्टलवर आधी चुकीचा क्रमांक नोंदविलेला आहे, अशा शेतकऱ्यांना या पोर्टलवरील मोबाइल क्रमांक बदलण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार काही अडचणी येत असतील, तर त्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून विस्तृत माहिती मिळू शकणार आहे.

असा करा मोबाइल क्रमांक अपडेट■  शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या https://pmkisan.gov.in/ लिंकवर क्लिक करावे. त्यात उजव्या बाजूला फार्मर कॉर्नरमध्ये अपडेट मोबाइल नंबरवर क्लिक करावे.■  अपडेट मोबाइल नंबर ही विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार क्रमांक टाकल्यानंतर आपला मोबाइल क्रमांक अपडेट करून घ्यावा.

■ त्यानंतर शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट होणार आहे.

३१ ऑगस्टपर्यंत करता येणार दुरुस्ती

शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या पोर्टलवर नोंदविलेला चुकीचा मोबाइल क्रमांक अपडेट करण्याची सुविधा केंद्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. 

लाभार्थी शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत पी.एम. किसान पोर्टलवर लॉगिन करून उपरोक्त निर्देशाप्रमाणे आपला मोबाइल क्रमांक दुरुस्ती करून घ्यावा. तसेच ई केवायसी आणि बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न करुन योजनेचा लाभ घ्यावा. - मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा

या शेतकऱ्यांना बदलावा लागणार नंबर

तालुका              शेतकरी संख्या
बुलढाणा१९६
चिखली११४
देऊळगाव राजा६६
जळगाव जामोद७६
खामगाव९८
लोणार१२२
मलकापूर५४
मेहकर९७
मोताळा१७८
नांदुरा९६
संग्रामपूर७५
शेगाव८६
सिंदखेडराजा६३
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनापीकखरीपशेतकरीशेती