Lokmat Agro >शेतशिवार > PM Modi Visit to Nashik : वारकऱ्यांसह भजन करून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना काय संदेश दिला?

PM Modi Visit to Nashik : वारकऱ्यांसह भजन करून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना काय संदेश दिला?

PM Modi's visit to Nashik Kalaram temple on National youth day of Swami Vivekanand Jayanti but onion farmers of Nashik detained by police | PM Modi Visit to Nashik : वारकऱ्यांसह भजन करून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना काय संदेश दिला?

PM Modi Visit to Nashik : वारकऱ्यांसह भजन करून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना काय संदेश दिला?

PM Modi Visit to Nashik : नाशिक दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री. काळाराम मंदिरात पूजा केली, त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांसोबत टाळ वाजवून भजनही केले. एका बाजूला कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी संतप्त असताना पंतप्रधानांच्या या कृतीचे वेगळे अर्थ काढले जात आहेत.

PM Modi Visit to Nashik : नाशिक दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री. काळाराम मंदिरात पूजा केली, त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांसोबत टाळ वाजवून भजनही केले. एका बाजूला कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी संतप्त असताना पंतप्रधानांच्या या कृतीचे वेगळे अर्थ काढले जात आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

स्वामी विवेकानंद जयंती (Swami Vivekanand Jayanti)  अर्थात राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा संमेलन होत असून त्याच्या उदघाटनासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi Visit to Nashik ) यांनी सकाळी नाशिकमधील रोड शोनंतर गोदावरीचे दर्शन घेतले, तसेच श्री. काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सुमारे २० मिनिटांहून अधिक काळ पंतप्रधान काळाराम मंदिर परिसरात होते. याठिकाणी त्यांनी रामाची आरती केलीच शिवाय राम मंदिराच्या सभामंडपाजवळ वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे टाळ वाजवून भजनातही भाग घेतला. यावेळी वारकरी संप्रदायाचे अनेक संत-किर्तनकारांनी ज्ञानेश्वरी, गाथा यांचे पठण केले. स्वत: पंतप्रधान ‘जय जय राम कृष्ण हरि’ या पारंपरिक भजनात रममाण होतानाचे लाईव्ह दृष्य जनतेने पाहिले.

गेले काही दिवसांपासून पंतप्रधान दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष वाढताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्यास आठवड्यात कांदा निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याचे बाजारभाव थेट दीड ते दोन हजार रुपयांनी पडले. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही काढणे अवघड झाले. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी पंतप्रधानांचा भेटण्याची मागणी केली, तर काही संघटनांनी निषेध नोंदविण्यासाठी आंदोलनाचा पावित्रा घेतला. त्यामुळे प्रशासनाने केवळ नाशिकच नव्हे, तर शेजारी असलेल्या नगर जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधी व नेत्यांना नोटीसा बजावून स्थानबद्ध केले. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर कांदा उत्पादकांसह शेतकऱ्यांचा रोष पाहायला मिळत आहे. तर आजच्या नाशिकच्या भाषणात पंतप्रधान मोदी शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी विशेषत: कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी काही विशेष घोषणा करतात का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

 

या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिरात वारकरी संप्रदायाच्या भजनाचे प्रतीक असलेले टाळ वाजून पंतप्रधानांनी भजनात सहभाग घेतल्याने त्यांनी एकप्रकारे राज्यातील वारकरी संप्रदाय आणि या संप्रदायाशी जोडलेल्या, निगडीत असलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहेत. महाराष्ट्रात शेतकरी आणि वारकरी संप्रदाय यांचे अतूट नाते आहे. दोघांनाही एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. शेतकऱ्यांचे आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग आणि त्याच्या भजनाचा मार्ग म्हणजे टाळ-मृदुंगाचा गजर. आज सकाळी निवडक वारकरी काळाराम मंदिरात उपस्थित राहिले आणि पंतप्रधानांनी श्री. काळाराम पुजेनंतर त्यांच्या भजनात सहभाग नोंदविणे म्हणजे वारकरी शेतकऱ्यांसोबत असल्याचे दाखविण्यासाठी मोदीजींनी ही कृती केल्याचे बोलले जात आहे.

  पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

पंतप्रधानांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्थानबद्ध केलेले शेतकरी संघटनेचे नेते नीलेश शेडगे यांनी सांगितले की एका बाजूला कांदा निर्यातबंदीसारख्या निर्णयांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांने शेतमाल भाव पाडून त्यांच्यावर अन्याय केला आहे. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांची आस्था असलेल्या वारकरी संप्रदायासोबत भजनात पंतप्रधान सहभागी होतात. याचा अर्थ म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांवर अन्याय करायचा, दुसऱ्या बाजूला त्यांचे लांगुलचालन करायचे असा हा प्रकार आहे. दरम्यान आज सकाळी मालेगावजवळील  महामार्गावर अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी, तसेच सोयाबीनसह इतर धान्याची निर्यात सुरू करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.

Web Title: PM Modi's visit to Nashik Kalaram temple on National youth day of Swami Vivekanand Jayanti but onion farmers of Nashik detained by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.