Lokmat Agro >शेतशिवार > PMMVY : शेतकरी महिलांनो, तुम्हाला मिळाले का पाच हजार रुपये? जाणून घ्या योजना

PMMVY : शेतकरी महिलांनो, तुम्हाला मिळाले का पाच हजार रुपये? जाणून घ्या योजना

PMMVY : Farmer women, did you get five thousand rupees? Know the plan | PMMVY : शेतकरी महिलांनो, तुम्हाला मिळाले का पाच हजार रुपये? जाणून घ्या योजना

PMMVY : शेतकरी महिलांनो, तुम्हाला मिळाले का पाच हजार रुपये? जाणून घ्या योजना

महिलांना कसा मिळतो लाभ, काय लागते पात्रता, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया घ्या जाणून (PMMVY)

महिलांना कसा मिळतो लाभ, काय लागते पात्रता, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया घ्या जाणून (PMMVY)

शेअर :

Join us
Join usNext

PMMVY :

ग्रामीण भागातील गरजू महिलांना मदत म्हणून शासनाने प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात महिलांना औषधोपचारासाठी तीन टप्प्यात आर्थिक मदत दिली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जानेवारी २०१७ रोजी ही योजना भारतात सुरू केली. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) ही केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राज्यात राबवली जाते.

महिलांना तीन टप्प्यांत मदत दिली जाते. जर पात्र महिला जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थी असेल, तर तिला अतिरिक्त १ हजार रुपये म्हणजेच एकूण ६  हजार रुपये दिले जातात.

महिलांनी जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात. लाभार्थीला ही रक्कम थेट आपल्या बँक खात्यात मिळते.

येथे मिळेल अर्ज

अर्ज करण्यासाठी फॉर्म ऑनलाइन भरावा लागणार आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला फॉर्म मिळवावा लागेल. तुम्ही महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://wcd.nic.in/वर जाऊन किंवा अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता.

काय आहे योजनेची पात्रता

* या योजनेसाठी लागणारी पात्रता अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

* या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो.

* गर्भपात / मृत जन्माच्या बाबतीत, लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यांसाठी पात्र असेल.

* राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार.

* प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात.

* या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात.

* लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे.

* लाभार्थी आणि त्‍याच्‍या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असेल.

असा मिळेल योजनेचा लाभ

या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला ५ हजार रुपये दिले जातात, जे हप्त्यानुसार तिला प्रदान केले जातात. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला १ हजार रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण ६ हजार रुपये पात्र महिलेला दिले जातात.

अशी मिळेल रक्कम

पहिला हप्ता : अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी १ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

दुसरा हप्ता :  गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर, किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शविणारी MCPकार्डची छायाप्रत जोडून २ हजार रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो.

तिसरा हप्ता : लाभार्थीकडून मुलाच्या जन्म नोंदणीची एक प्रत आणि मुलाने लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारे MCP कार्ड जोडल्यास २ हजार रुपयांचा तिसरा हप्ता दिला जातो.

हे लागतील कागदपत्रे

लाभार्थी महिलेने स्वतः ची आणि तिच्या पतीची रीतसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र/ संमती पत्र द्यावे लागेल.

मोबाईल नंबर - मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.

बँक खाते तपशील

MCP कार्ड (माता-बाल संरक्षण कार्ड)

लाभार्थी आणि तिचा पती यांच्या ओळखीचा पुरावा (आधार कार्ड किंवा दोघांचे ओळखपत्र)

रक्कम मिळाली की नाही ते असे तपासा

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत दिलेली आर्थिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाते.

या पध्दतीने करा अर्ज
 
सर्वप्रथम या योजनेचा अर्ज प्राप्त करावा.

हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी केंद्रातून किंवा आरोग्य सुविधा केंद्रातून मिळेल.

किंवा महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला wcd.nic.in भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता.

फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा करावी लागतील.

अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधाद्वारे तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल जी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल.
 

असे करा लॉगिन

सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmmvy-cas.nic.in ला भेट द्यावी लागेल.

तुमच्या समोर लॉगिन फॉर्म उघडेल.

तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

लॉग इन केल्यानंतर, पुढील पानावर तुम्हाला लाभार्थीची स्थिती जाणून घेण्याचा पर्याय मिळेल.

तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्चवर क्लिक करावे लागेल.

क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला मिळालेल्या हप्त्याची संपूर्ण माहिती मिळेल.

तुम्ही तुमचा पेमेंट रिपोर्ट तपासू आणि डाऊनलोड करू शकता.

Web Title: PMMVY : Farmer women, did you get five thousand rupees? Know the plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.