Lokmat Agro >शेतशिवार > Pocra Scheme पोकरा प्रकल्पातील ७८० जणांची नोकरी जाणार; कृषी संजीवनीची डेडलाइन

Pocra Scheme पोकरा प्रकल्पातील ७८० जणांची नोकरी जाणार; कृषी संजीवनीची डेडलाइन

Pocra Scheme 780 people will lose their jobs in the Pocra project; Deadline from Agriculture Sanjeevani | Pocra Scheme पोकरा प्रकल्पातील ७८० जणांची नोकरी जाणार; कृषी संजीवनीची डेडलाइन

Pocra Scheme पोकरा प्रकल्पातील ७८० जणांची नोकरी जाणार; कृषी संजीवनीची डेडलाइन

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला

शेअर :

Join us
Join usNext

सूरज पाटील

सहा वर्षांपूर्वी सुर करण्यात आलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोकरा) मुदत ३० जूनला संपत आहे. त्यासंदर्भात प्रकल्प संचालकांचे पत्र धडकल्याने राज्यातील ७८० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

विदर्भ - मराठवाड्यातील १६ जिल्ह्यात प्रकल्पाची अंमलबजावणी २०१८ पासून सुरू झाली होती. या प्रकल्पाची मुदत सहा वर्षांसाठी होती. ही मुदत ३० जून २०२४ ला संपुष्टात येत आहे. प्रकल्पामार्फत उपलब्ध करून दिलेले कंत्राटी मनुष्यबळ ३० जूनपर्यंत त्यांच्या कार्यालयात उपलब्ध राहणार आहे.

त्यानंतर त्यांची सेवा समाप्त होणार आहे. त्यामुळे नेमून दिलेली कामे विहित वेळेत पूर्ण करून प्राथमिक अहवाल प्रकल्प कार्यालयास १५ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी कृषी अधीक्षकांना दिले आहेत.

या जिल्ह्यात होता प्रकल्प

पोकरा हा प्रकल्प राज्यातील १६ जिल्ह्यांत सुरू होता. यात यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी, जळगाव व नाशिकचा समावेश होता.

हेही वाचा - Success Story आंब्याने दिली सुखाची दिशा; प्रगतीशील मिठ्ठू काकांची ही यशकथा

Web Title: Pocra Scheme 780 people will lose their jobs in the Pocra project; Deadline from Agriculture Sanjeevani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.