Lokmat Agro >शेतशिवार > डाळींब २०० रु किलो! ऐन उपवासात का वाढल्या डाळींबाच्या किमती?

डाळींब २०० रु किलो! ऐन उपवासात का वाढल्या डाळींबाच्या किमती?

Pomegranate Rs 200 kg! Why did the price of pomegranate increase during fasting? | डाळींब २०० रु किलो! ऐन उपवासात का वाढल्या डाळींबाच्या किमती?

डाळींब २०० रु किलो! ऐन उपवासात का वाढल्या डाळींबाच्या किमती?

डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा, येत्या काळात काय मिळेल भाव?

डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा, येत्या काळात काय मिळेल भाव?

शेअर :

Join us
Join usNext

यावर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस तसेच काही महिन्यांपूर्वी डाळिंब पिकावर आलेला तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात फटका डाळिंब पिकांना बसल्याने यंदा ऑक्टोबर महिन्यात डाळिंबाची आवक घटली आहे. पेठरोड बाजार समितीत डाळिंब बाजारात गत काही दिवसांपासून डाळिंबाची केवळ २० ते २५ वाहने भरून माल येत असल्याने डाळिंब दर २०० रुपयांवर पोहोचले आहेत.

डाळिंब फळ उत्पादन अनेक कारणास्तव कमी अधिक होत असल्याने भाव देखील टिकून राहिले नाहीत; परंतु यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच डाळिंब बाजारभाव तेजीत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला सध्या नवरात्रात डाळिंब मागणी वाढली आहे. नाशिक उत्पन्न बाजार समितीत गेल्या दिवसांपासून डाळिंब मालाची कमी झाली आहे. बाजार समितीत साधारणपणे दैनंदिन नगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, संगमनेर आणि सटाणा या भागातून केवळ २० ते २५ चारचाकी वाहने डाळिंब आहे. विक्रीसाठी दाखल होत आहेत. नाशिक मालाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोड कृषी शरदचंद्र पवार फळ बाजार समितीतून काही दैनंदिन संपूर्ण भारतात तसेच आवक नेपाळमध्ये डाळिंब माल रवाना केला जात आहे.

डाळिंब हंगाम सुरु झाल्याने डाळिंब खरेदी करण्यासाठी राज्यातील व्यापारी बाजार समितीत दाखल झाले आहेत. यंदा डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव तर जाणवला शिवाय कमी पावसाचा डाळिंब उत्पादनावर परिणाम झाल्याने बाजारात आवक कमी होत आहे. आवक कमी असल्याने काही दिवस डाळिंबाचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.- सुभाष अग्रहरी, डाळिंब व्यापारी, कृउबा, नाशिक

तीन महिन्यांपूर्वी जुलै महिन्यात डाळिंब मालाला साधारण १०० ते १२५ रुपये प्रतिकिलो असा दर मिळत होता. त्यावेळी डाळिंबाच्या बाजारभावाची गोडी वाढली होती. जुलै ते थेट दिवाळी असा डाळिंबाचा हंगाम असला तरी याच कालावधीत कमी पाऊस झाल्याने त्यातच तेल्या रोगाचा डाळिंब पिकांना फटका बसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारभाव तेजीत आले आहेत. 

डाळिंब आवक कमी असली तरी सध्या नवरात्रोत्सव असल्याने भाविक उपवास करतात. उपवासाला डाळिंब फळ चालते त्यामुळे आगामी काळात आणखी काही दिवस आवक कमी असली तरी डाळिंब बाजार टिकून राहण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Pomegranate Rs 200 kg! Why did the price of pomegranate increase during fasting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.