Lokmat Agro >शेतशिवार > जत तालुक्यात रिमझिम पावसामुळे डाळिंबावर बिब्या !

जत तालुक्यात रिमझिम पावसामुळे डाळिंबावर बिब्या !

pomegranates disease in Jat taluka of Sangali | जत तालुक्यात रिमझिम पावसामुळे डाळिंबावर बिब्या !

जत तालुक्यात रिमझिम पावसामुळे डाळिंबावर बिब्या !

फळावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगाने फळे फुटली आहेत. तेल्या रोगग्रस्त फळे तोडून टाकली आहेत. बागेजवळ फळांचे ढीग लागले आहे.

फळावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगाने फळे फुटली आहेत. तेल्या रोगग्रस्त फळे तोडून टाकली आहेत. बागेजवळ फळांचे ढीग लागले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, प्रतिकूल हवामान, यामुळे सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील डाळिंबांवर बिब्या फळकूज रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत शेततलाव आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डाळिंबाच्या बागा उभ्या केल्या आहेत. डाळिंबाचे क्षेत्र १५ हजार ३४४.५९ एकर असून सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, सिद्धनाथ, आसंगी (जत), दरीकोणूर, वाळेखिंडी, काशीलिंगवाडी या परिसरात डाळिंब क्षेत्र अधिक आहे. पाऊस नसताना शेतकऱ्यांनी टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या आहेत.

आता मान्सूनचा पाऊस, ढगाळ व प्रतिकूल वातावरणाचा फटका बसला आहे. फळावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगाने फळे फुटली आहेत. तेल्या रोगग्रस्त फळे तोडून टाकली आहेत. बागेजवळ फळांचे ढीग लागले आहे.

या भागात केशर वाणाच्या बागा अधिक आहेत. उत्पादनात घट होणार आहे. संख, दरीबडची, उमदी, या भागात बागा वाचविण्याची धडपड सुरू आहे.. प्रादुर्भाव टाळण्यासाठी महागड्या औषधांचा मारा करत आहेत. मात्र, कशाचाही उपयोग होत नाही, हे लक्षात आल्याने, अनेक शेतकऱ्यांनी दरीबडची (ता. जत) येथे रोगग्रस्त डाळिंबाची फळे तोडून टाकली आहेत.

दरम्यान तालुक्यातील विकास सोसायट्यांनी बागांवर कोट्यवधीच्या कर्जाचे वाटप केले आहे. बागा अडचणीत आल्याने लाखो रुपयांचे येणे बाकी असल्याने, विकास सोसायट्या अडचणीत येणार आहेत.

रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण व प्रतिकूल वातावरणामुळे बिब्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. उत्पादनात घट होणार आहे. यंदा बदलत्या वातावरणाचा फटका डाळिंबाला बसला आहे. नुकसानीचे पंचनामे करून राज्य शासनाने मदत करावी.
- सिदगोंड माळी, दरीबडची, डाळिंब उत्पादक शेतकरी.

 

Web Title: pomegranates disease in Jat taluka of Sangali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.